Agonda Water Tanks Dainik Gomantak
गोवा

Agonda Panchayat: आगोंदमध्‍ये होतोय अशुद्ध पाण्‍याचा पुरवठा!

Canacona Social Health Center: इस्पितळातर्फे अहवाल पोलिस व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाला सादर करण्‍यात आल्‍यामुळे भागात खळबळ

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद येथील काही भागात काही पाण्यांच्या टाक्यांमधून पिण्यायोग्य पाणी वितरित होत नसल्याचा अहवाल काणकोण सामाजिक इस्पितळातर्फे पोलिस व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाला सादर करण्‍यात आल्‍यामुळे या भागात खळबळ माजली आहे.

मात्र, आगोंद पंचायतीला यासंबंधीची प्रत मिळालेली नाही. दरम्‍यान, येथील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असून तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होऊ लागली आहे.

काँग्रेसचे नेते जनार्दन भंडारी यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात काणकोण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पाणीपुरवठा विभाग व काणकोण सामाजिक इस्पितळाला आगोंद येथील पाण्याच्या शुद्धतेबाबत अहवाल सादर करण्याची सूचना काणकोण पोलिस निरीक्षकांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर काणकोण सामाजिक इस्पितळातर्फे पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्‍या अनुषंगाने आता आगोंद येथे पुरविण्यात येत असलेल्या काही टाक्यांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल इस्पितळाला प्राप्त झाला आहे.

सदर अहवाल इस्पितळातर्फे काणकोण पोलीस व काणकोण पाणी पुरवठा विभाग यांना सादर केला‌ आहे. आगोंद येथील काही भागात पुरविण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी चिंता व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तातडीने अशुद्ध पाणी वितरण त्वरित थांबवून शुद्ध पाणी वितरित करण्याची मागणी केली आहे.

कनिष्ठ अभियंत्याची केली होती बदली

काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी आगोंद, मुडकुड येथे ग्रामस्थांसमवेत पाण्याच्या टाकी व पंपहाऊसचे निरीक्षण करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्‍या होत्या. त्यानंतर संबंधित विभागाने एका कारवाईत या ठिकाणी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्याची तातडीने अन्यत्र बदली केली होती. अशा धडक कारवाईची आता गरज आहे, असे लोक बोलू लागले आहेत.

काणकोण सामाजिक इस्पितळाचा पाण्‍याबाबतचा अहवाल अजून ग्रामपंचायतीला मिळालेला नाही. त्‍यामुळे आपण यासंदर्भात काहीच बोलू शकत नाही.
प्रीटल फर्नांडिस, सरपंच (आगोंद‌)
आगोंद भागात पिण्‍यासाठी शुद्ध पाणी न मिळणे हे आमचे दुर्दैव आहे. पाण्याच्या टाक्यांची पाहणी कधी होतच नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ चालला आहे.
जनार्दन भंडारी, काँग्रेस नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वाहतूक नियमांचे डोळ्यांसमोर उल्लंघन, रक्षक सुस्तच; राजधानी पणजीत पाटो पुलावर रात्रीची स्‍थिती गंभीर; 'नो एन्‍ट्री'तूनही शिरतात वाहने

Drowning Death: कुळेत आणखी दोघांचा बुडून मृत्‍यू, दोघेही मूळ कर्नाटकचे; राज्यात गेल्‍या 21 दिवसांत 12 जणांचा दुर्दैवी अंत

ED Raid Goa: 'साळगावकर' समूहाची 1,023.85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, अवैध लोहखनिज उत्खननप्रकरणी 'ईडी'ची कारवाई

Horoscope: बुधाच्या राशीबदलाचा मोठा प्रभाव! 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळणार मोठे यश

Marwar History Rathore Dynasty: औरंगजेबालाही झुकवणारा रणधुरंधर! दुर्गादास राठोडांनी 30 वर्षे लढून वाचवले 'मारवाड'चे स्वातंत्र्य

SCROLL FOR NEXT