CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : वास्कोतील पाणीपुरवठ्यात सुधारणा : मुख्यमंत्र्यांची माहिती

Vasco News : : जुनी पाणी पाइपलाइन बदलण्याचे काम सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, वास्को मतदारसंघात पाणीपुरवठा करणारी जुनी पाइपलाइन बदलण्याचे काम सुरू आहे. पाणीसाठा टाक्यांची साफसफाई करण्यात येईल. पाणीपुरवठ्याची अत्याधुनिक यंत्रणांची माहिती घेऊन ती लागू करण्याबाबत विचार करता येईल.

वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. या मतदारसंघात सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिली.

वास्को मतदारसंघात आवश्‍यक असलेल्या पाणीपुरवठ्यापेक्षा या परिसरात असलेल्या ओव्हरहेड टाक्या व जमिनीवर असलेल्या टाक्यांमध्ये कमी पाणीपुरवठा होतो. नवेवाडे येथील ओव्हरहेड पाण्याच्या टाकीचे सतत सिमेंट काँक्रिटचे तुकडे पडत असल्याने या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या टाक्यांची साफसफाई करण्याची आवश्‍यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाई झाली नसल्याने लोक आजारी पडण्याची शक्यता आहे. पाणी सोडण्यासाठी व्हॉल्व फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे, तसेच टाक्यांची दुरुस्तीही प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी सभागृहात मांडून लक्ष वेधून घेतले.

वास्को मतदारसंघासाठी २२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वीज खंडित झाल्यास काहीवेळा पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन पाण्याची कमतरता होऊ शकते. काही ठिकाणी पाइपलाइन जुनी झाल्याने ती फुटून किंवा पाण्याची गळती होण्याने पाणीसमस्या होऊ शकते. उन्हाळ्यात पाणी समस्या तक्रारी खात्याकडे आलेल्या नाहीत. ओव्हरहेड व जमिनीवर टाक्यांच्या सभोवताली कंपाउंड आहे, त्यामुळे लोकांना तेथे जाता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टाक्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई

पाण्याच्या टाक्या बांधकामदृष्ट्या सुरक्षित आहेत व लहानसहान दुरुस्तीची गरज आहे. जमिनीवरील टाक्यांमधून ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पंपाने चढविले जाते. या टाक्यांची वेळोवेळी साफसफाई केली जाते. पावसाळ्यानंतर या टाक्या यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यात येतील, त्यामुळे नवेवाडे येथील लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

आमदार काय म्हणाले...?

या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेवेळी आमदार दिगंबर कामत यांनी वीजेचा होणारा लपंडाव कमी करण्यात यावा व टाक्यांची सफाई करण्याची मागणी केली.

वास्कोमध्ये बंदर असल्याने हे प्रमुख शहर असताना तेथे पाणीटंचाई होणे हे सरकारचे अपयश आहे, असे आमदार व्हेंझी व्हिएगश म्हणाले.

प्रत्येक मतदारसंघातील कमकुवत झालेल्या पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करा अशी मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली.

ज्या टाक्यांचा वापर होत नाही त्या ठिकाणी काही बेकायदेशीर प्रकार सुरू असतात त्यामुळे त्या टाक्या मोडण्यात याव्यात असे आमदार नीलेश काब्राल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT