IAS Sneha Gitte Dainik Gomantak
गोवा

POP गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीचे कठोरतेने पालन करा; हिंदू जनजागृती समिती

प्लास्टर ऑफ पॅरिसपाच्या मूर्तीवर बंदी घालून शाडू मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तींच्या विक्रीस प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी समितीने केलीय.

Pramod Yadav

पणजी: प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यावर तरंगतात. त्यातून श्री गणेशाची विटंबना होते. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, तलाव आदींमध्ये प्रदूषण होते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदीचे कठोरतेने पालन करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे त्यांच्याकडे बंदीच्या अंमलबजावणीचे पालन करण्याची मागणी केली.

प्लास्टर ऑफ पॅरिसपाच्या मूर्तीवर बंदी घालून शाडू मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तींच्या विक्रीस प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी समितीने केलीय.

या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये ’जनहित समिती’चे सर्वश्री जंग बहादूर चौहान, हिंदू जनजागृती समितीचे सुशांत दळवी आणि राज बोरकर आणि सनातन संस्थेचे महेश प्रभू उपस्थित होते.

राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणार्‍या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी असूनही प्रतिवर्ष राज्यातील काही ठिकाणी अशा मूर्तींची विक्री होत असते. काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना वरून मातीचा थर देऊन त्यांचीही विक्री केली जाते, असे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी देखील करण्यात आली. शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करणे, जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी, अस समितीने निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT