Yellow Alert In Goa
Yellow Alert In Goa 
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात पाच दिवस पावसाची शक्यता, तीन दिवस यलो अलर्ट

Pramod Yadav

Yellow Alert In Goa

गोव्यात आजपासून पाच दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातील तीन दिवस यलो अलर्ट गोवा वेधशाळेच्या वतीने देण्यात आला आहे. याकाळात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात आजपासून (22 मे) पुढील पाच दिवस (26 मे) राज्यात पावसाची शक्यता आहे. यातील 22, 23 आणि 24 मे या तीन दिवशी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील एक ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

गोव्यात पुढील एक ते तीन तासांत सत्तरी, धारबांदोडा आणि डिचोली तालुक्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

गोव्यात गेल्या चोवीस तासांत काणकोण येथे सर्वाधिक 25.6 मिली मीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल साखळीत दहा, फोंडा येथे 8 तर ओल्ड गोव्यात 1.4 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Petrol Diesel Price: शनिवारपासून इंधन महागणार, गोव्यातील पंपांवर वाहनधारकांची गर्दी

NEET Exam Scam: ‘NDAच्या रावणराज्याच्या विरोधात विद्यार्थी शक्ती एकवटली’; नीट परीक्षा घोट्याळ्यावरुन आलेमाव यांचा हल्लाबोल

Goa Monsoon 2024: पुढील 24 तास गोव्यात मुसळधार, रविवारी 'रेड अलर्ट'चा इशारा

MBBS Admission 2024 : ‘ट्रॅव्हको एज्युकेशन’तर्फे एमबीबीएस इच्छुकांसाठी संधी; जून अखेरपर्यंत प्रवेश

Saudi Arabia Haj Yatra: हज यात्रेला गेलेल्या 98 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने केली पुष्टी

SCROLL FOR NEXT