Goa Weather Update Canva
गोवा

Goa Weather Update: गोव्यात पुन्हा हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट'; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

Goa Yellow Alert: राज्यात अवकाळी पावसानं पुन्हा दस्तक दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कमालीचा गारठा वाढला आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यात अवकाळी पावसानं पुन्हा दस्तक दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कमालीचा गारठा वाढला आहे. कडाक्याच्या थंडीत पावसाची हजेरी गोमंतकीयांची चिंता वाढवत आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. शुक्रवारी (6 डिसेंबर) साठी हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात 40 ते 50 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याआगोदर 4 डिसेंबर रोजी हवामान विभागाकडून यलो अलर्ट वर्तवण्यात आला होता.

दरम्यान, दक्षिण भारतात सध्या फेंगल चक्रिवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रिवादळाने अवघ्या दक्षिण भारताला वेढले आहे. या चक्रिवादळामुळेच गोव्यातही (Goa) गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला असून अधूनमधून पावसाच्या सरी बरसातयेत.

दोन दिवसांपूर्वी, वाळपईत (Valpoi) अवकाळी सरी बरसल्या. सकाळपासून वाळपईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. संध्याकाळी अचानक पावसानं हजेरी लावली. डिसेंबर महिन्यात गावागावांत जत्रोत्सव, फेस्त तसेच इतर कार्यक्रम होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे लोकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

दरम्यान, दक्षिण गोव्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 530 घर मालकांना तब्बल 2.52 कोटी रुपयांची मदत वितरित केली. 2024 सह 2023 मध्ये नुकसान झालेल्या काही घरांचाही यामध्ये समावेश आहे. सासष्टीत सर्वाधिक 175 तर फोंडा तालुक्यातील 117 घरांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT