Yellow alert Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Yellow Alert In Goa: पुढील चोवीस राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Yellow Alert In Goa

गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, यातील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात ११ आणि १२ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात ११ ते १६ मे या काळात तुरळक पावसाची शक्यता असून, ११ व १२ तारखेला वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट देखील जारी केला आहे.

गेल्या २४ तासांत राजधानी पणजीत सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले असून, मुरगावमध्ये सर्वात कमी २५.८ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

दक्षिण तसेच उत्तर गोव्यात १२ आणि १३ मे रोजा वीजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याची शक्यता असून, याकाळात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

तसेच, पुढील चोवीस राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

Claudia Konkani Film: इंडियन पॅनोरमामध्ये ‘क्लावदिया’ला स्‍थान, कोकणी चित्रपटाचा सन्‍मान; 27 रोजी होणार प्रदर्शन

SCROLL FOR NEXT