Wave Surge Goa 
गोवा

Wave Surge Goa: गोव्यात समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता, IMD कडून सतर्कतेचा इशारा

Goa Weather Update: गोव्यात आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु असून, आज रेड तर पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Pramod Yadav

गोवा हवामान खात्याने आजही (दि.१६ जुलै) पावसाचा रेड अलर्ट जारी केला असताना, आता समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने समुद्रकिनाऱ्याच्या नागरिकांना आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

आज रेड पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

गोव्यात गेल्या आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने राज्यात १६ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील दोन दिवसांसाठी (१७ आणि १८ जुलै) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्यासह विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत.

विधानसभेतही मांडला मुद्दा

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी सध्या सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात देखील याची माहिती दिली. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर देताना राज्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने लाटांबाबत इशारा दिला जात आहे. त्यामुळे याबाबत अधिक काळजी किंवा घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, गोवा सरकारने अशा प्रकारच्या घटनांसाठी योग्य काळजी घेतली असून, २१ ठिकाणी शेल्टर हाऊस तयार केले आहे. चुकून राज्यात अशी घटना घडलीच तर राज्य तयार असल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT