Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: किनारी भागात बेकायदा लाकडी पलंग

अतिक्रमण : पर्यटकांना अडथळा; मोकाट गुरांचाही वाढला उपद्रव

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्‍‍वे-मांद्रे, हरमल या किनारी भागात पर्यटन हंगामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. ज्यांना पर्यटन खात्याकडून लाकडी पलंग घालण्याची मुभा नाही, तेसुद्धा असे पलंग घालून व्‍यवसाय करीत आहेत. त्‍यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या लोकांना, पर्यटकांना अडथळा निर्माण होत आहे.

दरम्‍यान, बेवारशी गुरे, जनावरे या पलंगांजवळच ठाण मांडून बसतात. त्‍यामुळे या परिसराला ओंगळवाणे स्‍वरूप प्राप्त झाले आहे. पर्यटन खात्याने योग्य ती पावले उचलून त्‍यावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एका बाजूने ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी वाढत आहेत तर दुसऱ्या बाजूने समुद्राच्या पाण्यातही पलंग आसनव्यवस्था पोहोचली आहे.

कारवाई नावापुरतीच; क्रॉस मसाजही सुरू

मोरजी, विठ्ठलदासवाडा किनारी भागात बिगरगोमंतकीय व्यावसायिक मोठ्या संख्‍येने बेकायदा लाकडी पलंग, टेबल्स घालून जागा अडवितात. मात्र पर्यटन खात्‍याकडून याकडे दुर्लक्ष केले जातेय. मागच्या वेळी अशा लाकडी पलंगांवर दोन वेळा पर्यटन खात्याने कारवाई केली. परंतु नंतर लगेच ते पलंग व्यावसायिकांना परत मिळाले आणि ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे पुन्हा अतिक्रमण सुरू झाले. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे या पलंगांवर काही ठिकाणी क्रॉस मसाजही सुरू असल्‍याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT