Illegal Stone Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Stone Mining: मिराबाग येथील बेकायदा चिरेखाणीवर खाण खात्याची मोठी कारवाई; करोडोंची यंत्रसामग्री जप्त

Illegal Stone Mining Goa: मिराबाग येथील बेकायदेशीर चिरेखाणीवर खाण खात्याने काल सोमवार (17 मार्च) अचानक छापा टाकून करोडो रुपयांची यंत्रसामग्री जप्त केली.

Manish Jadhav

केपे: कुडचडे पोलिस स्थानकापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर चालणाऱ्या मिराबाग येथील बेकायदेशीर चिरेखाणीवर खाण खात्याने सोमवार (17 मार्च) अचानक छापा टाकून करोडो रुपयांची यंत्रसामग्री जप्त केली. या कारवाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कतपणे चालणाऱ्या या चिरेखाणी सोमवारपासून बंद पडल्या आहेत. या खाणीतून बेकायदेशीर चिरे काढल्याने सरकारचे (Government) सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे खाण खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे.

बेकायदेशीर चिरे काढण्याचा व्यवसाय सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मिराबाग-सावर्डे येथे गेल्या पाच वर्षांपासून सरकारी तसेच खासगी जागेत बिनदिक्कतपणे बेकायदेशीर चिरे काढण्याचा व्यवसाय सुरु होता. या चिरे खाणीवर नावापुरती अनेकदा कारवाई करण्यात आली होती, पण सोमवारी खाण खात्याने कुणालाही पूर्वकल्पना न देता मिराबाग येथे धडक देऊन सरकारी जागेत चालणाऱ्या सोळा बेकायदेशीर चिरेखाणींवर कारवाई करुन चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारे 17 पॉवर टिलर, जेसीबी, व्हील लोडर, ट्रक आणि जनरेटर जप्त करण्यात आले आहेत.

पोलिस तैनात

खाण खात्याने यंत्रसामग्री जप्त करुन कुडचडे पोलिसांच्या स्वाधीन केली असून सध्या या समग्रीचे रक्षण करण्यासाठी पोलिस तैनात केले आहेत. ही यंत्रसामग्री बरीच अवजड असल्याने ती जागेवरुन हटविण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे कुडचडे पोलिसांनी (Police) सांगितले आहे. पुढील तपास कुडचडे पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT