Pollem Check Post Dainik Gomantak
गोवा

माजाळी तपासणी नाक्यावर 90 हजारांचे स्पिरिट जप्त

अबकारी खात्याने वाहनासह सुमारे 24 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली.

दैनिक गोमन्तक

काणकोण : कर्नाटकातील अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी माजाळी तपासणी नाक्यावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारे स्पिरिट जप्त केले. त्याचप्रमाणे बेकायदा दारू वाहनासह ताब्यात घेतली. अबकारी खात्याने वाहनासह सुमारे 24 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली. त्याचप्रमाणे काल अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी कार दारूसह ताब्यात घेतली.

सोमवारी रात्री टी एन बी -झेड 2794 या मालवाहू कॅन्टरमधून या मालाची वाहतूक करण्यात येत होती. वाहनाच्या हौद्यात दर्शनी भागात हार्पिकचे रिकामे खोके आणि मागच्या बाजूला स्पिरीटचे कॅन ठेवले होते. या अवैध वाहतुकीसंबंधी कर्नाटकातील अबकारी खात्याला खबऱ्याने माहिती दिल्याप्रमाणे पोळे तपासणी नाका ओलांडून ते वाहन माजाळी तपासणी नाक्यावर पोचल्यानंतर अबकारी अधिकाऱ्यांनी वाहन अडवून तपासणी केली असता, त्यांना सुमारे 90 हजार 300 रुपयांचे स्पिरिट, सुमारे 8 लाख रुपये किंमतीचे इतर साहित्य सापडले.

आज अशाच प्रकारे एक कॅन्टर गोव्यातून स्पिरिट घेऊन कर्नाटकात जाणार असल्याची माहिती काणकोण अबकारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोळे तपासणी नाक्यावर ट्रक (केएल - एस.8182) अडवून तपासणी केली. मात्र, काही दारूची प्रिंटेड लेबल्स वगळता काहीच संशयास्पद सापडले नाही, असे अबकारी खात्याचे अधीक्षक चंद्रशेखर देसाई आणि अबकारी निरीक्षक अंकुश काणकोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT