Goa Police  Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्ये सापडले दोन बेकायदा मसाज पार्लर; पोलिसांनी 25 स्पांची केली पाहणी

गोव्यात केवळ 166 स्पा-मसाज पार्लर हे नोंदणीकृत आहेत.

दैनिक गोमन्तक

कळंगुट : पोलिसांनी बुधवारी कळंगुट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाज पार्लर व स्पांची तपासणी केली. दरम्यान, एकूण 25 मसाज पार्लर आणि स्पा तपासण्यात आले. यातील 20 बंद आढळून आले. कार्यरत आढळलेल्या 5 मसाज पार्लरपैकी दोन मसाज पार्लर अधिकाऱ्याने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनात आले.

या 2 पार्लरविरोधातील क्लोजर रिपोर्ट पुढील आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीएम सावंत यांनी राज्यातील सर्व बेकायदेशीर मसाज पार्लरवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.

गोव्यात केवळ 166 स्पा-मसाज पार्लर हे नोंदणीकृत आहेत. गेल्या दहा वर्षात पाच मसाज पार्लरचा परवाना रद्द केला गेला आहे. हे परवाने मसाज पार्लरच्या मालकांनी स्वतः अर्ज करून रद्द करवून घेतले आहेत. परंतु गेल्या दहा वर्षात, बेकायदेशीर कृत्यात सहभागी असल्याच्या कारणाने एकही मसाज पार्लर बंद झालेला नाही, अशी माहिती ‘अर्ज’ या संस्थेने माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळवली आहे.

अर्ज (अन्याय रहित जिंदगी) ही स्वयंसेवी संस्था 1998 पासून व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणाऱ्या मानवी तस्करीविरोधात काम करते. त्याशिवाय ही संस्था लैंगिक शोषणातून सुटका करून राज्याच्या संरक्षणात असलेल्या महिला आणि मुलींना पुनर्वसन सेवाही पुरवते. मसाज पार्लरवर छापा टाकताना पोलिसांना ‘अर्ज’ वेळोवेळी साहाय्य करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT