Goa News |Sand Selling  Dainik Gomantak
गोवा

Goa News: रेती माफियांचा धुडगूस; बेकायदेशीर रेतीविक्री सुरु

सध्या गोव्यात कायदेशीररीत्या रेतीही काढता येत नाही ,तरी मिळेल तिथून रेती उचलून मिळेल विकणे रेती माफियांचा नवीन धंदा बनला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: चीनमध्ये लोह खनिजाला मागणी वाढली होती, त्यावेळी गोव्यात मिळेल तेथून खनिज ओरबाडून ते चीनला पाठविण्याचा सपाटा खाण माफियांनी लावला होता. आता पुन्हा एकदा गोव्यात तशीच परिस्थिती उद्भवली आहे. मात्र, यावेळी ही ओरबाड खनिजासाठी नसून रेतीसाठी होत आहे.

सध्या गोव्यात कायदेशीररीत्या रेतीही काढता येत नाही आणि चिरेही. त्यामुळे कित्येकांची बांधकामे अडून पडली आहेत. त्याचाच फायदा आता या रेती माफियांनी उठविला आहे. मिळेल तिथून रेती उचलून मिळेल त्या भावाने विकणे हा सध्या त्यांचा नवीन धंदा बनला आहे.

म्हापसा पालिकेतील गजाली...

शिमगोत्सव समितीवर चर्चेसाठी म्हापसा पालिकेची सोमवारी बैठक झाली. प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी समितीत पालिकेचे नगरसेवक तसेच पूर्वीच्या शिमगोत्सव सदस्यांचा समावेश करण्यात आला. यात एका नगरसेवकाचे नाव समाविष्ट करण्यात आले.

मात्र, हा नगरसेवक बैठकीस उपस्थित नसताना तुम्ही त्याच्या नावाचा कसा समावेश करता, असे अ‍ॅड. शशांक नार्वेकर म्हणाले. माझा संबंधिताच्या नावास आक्षेप नाही, परंतु बैठकीस त्या व्यक्तीने उपस्थित राहणे गरजेचे. फोन करून माझे नाव समितीत घाला असे म्हणून चालत नसते.

अखेर या युवा नगरसेवकाचा समावेश या कमिटीत करण्यात आला. तसेच बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभारी नगराध्यक्षांच्या बाजूच्या खुर्चीवर माजी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर या बसल्या होत्या. एरवी वायंगणकर पालिकेतील बैठका नियंत्रित करायच्या. मात्र, आता नवीन पालिका मंडळ स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्या फक्त नगरसेवक म्हणून बैठकीस हजर राहिल्या!

...त्यांना कोणी बोलावले?

म्हादईचे निमित्त करून आमदार विजय सरदेसाई यांनी जे भाजपात येण्याचे आव्हान दोतोर मुख्यमंत्र्यांना दिले होते त्याच्या अनुषंगाने वरील चर्चा सध्या फातोर्ड्यात रंगली आहे व तेथील दामबाबाचे (दामू) समर्थक ‘त्यांना’ भाजपात कोणी बोलावलेय असे प्रश्न करत आहेत.

ते म्हणतात की एकदा ते भाजपाबरोबर आले व काय घडलेय ते आम्ही पाहिलेय. त्यांना भाजपात येण्याचे वेध लागले आहेत व त्यासाठी म्हादईचे ते निमित्त करत आहेत, पण आम्हाला पुन्हा विषाची परीक्षा नको आहे. आता बोला. दुसऱ्या बाजूने स्वतः विजय सरदेसाई म्हणू लागले आहेत, की या भाजप पक्षात जाणार तरी कोण?

मराठी अकादमी सक्रिय

गोवा मराठी अकादमी सक्रिय होत आहे ही समाधानाची बाब. फोंडा शाखेतर्फे अभिवाचनाचे दोन कार्यक्रम झाले. फोंड्यात आणखीन होऊ शकतात. अंत्रुज महाल तसा सुपीक आहे. प्रतिभावंतांचे, प्रज्ञावंतांचे, लेखक, कवींचे हे कुळागरच म्हणावे. तरीसुध्दा काही वक्ते कॉन्स्टंट आहेत. असो.

अभिवाचन हा हल्लीच्याच काळात उगवलेला शब्द. आता अभिनय करण्याजोगे ललित साहित्यात काय असते हा संशोधनाचा विषय. प्रत्यक्षात लेखकाकडे अभिनयासहित सादर करण्याची कुवत, कला कौशल्य असतं का हा दुसरा विषय. काही का असेना. वक्ते कुणी का असेना, गाडी चालत राहते तेव्हा ती तंदुरुस्त राहते हा न्यूटनचा सिध्दांत नव्हे, साधी सरळ गोष्ट ही.

तथापि, कोकणी अकादमीची गाडी मात्र अजूनही स्टार्ट होत नाही. नवीन अध्यक्ष येत आहेत अशी वदंता आहे. गाडी घोड्याच्या लालसेने, शर्यतीत चार लोक बाशिंग बांधून आहेत अशीही चर्चा सुरू आहे.

मोपावर उतारा पेडणे ते काणकोण रेल्वे

‘फातर्प्याहून गोंय लागी’ अशी एक कोकणीत म्हण आहे. त्याचप्रमाणे पेडणे ते काणकोण प्रवास फक्त 45 मिनिटे करण्यासाठी पेडणे ते काणकोण रेल्वे सुरू करण्याचा विचार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्यांचीही चूक नाही, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच.

मात्र, मोपामुळे काणकोणवासीयांवर अन्याय झाला आहे. त्यात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा नाही या अडचणीची अप्रत्यक्षरीत्या कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गेले वर्षभर काणकोणवासीय काणकोण रेल्वे स्थानकावर पूर्ववत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यासाठी निवेदने, आंदोलने, उपोषणे करीत आहेत.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याची प्रत्यक्ष दखल घेतली नाही. रेल्वे ही अंत्योदय गटातील प्रवाशांचे वाहतुकीचे व प्रवासाचे साधन. सरकार अंत्योदय तत्त्वावर चालत असल्याचा डांगोरा पिटला जातो. मात्र, या गटांसाठी कृती शून्य अशी चर्चा रेल्वे थांबा प्रश्नावरून काणकोणात सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'अशी मीटिंग झालीच नाही'! तवडकरांच्या विषयावरून प्रदेशाध्‍यक्षांचे कानावर हात; भाजप नेत्यांची सावध प्रतिक्रिया

Goa SAG: ‘साग’मधील जंगी स्‍वागतामुळे संचालक गावडे वादात, कारणे दाखवा नोटिस; गावडे - तवडकर वादाची चर्चा

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

SCROLL FOR NEXT