Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining: अखेर पाच जणांवर गुन्हा, म्हादई नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन; 'दैनिक गोमन्तक'च्या वृत्तानंतर यंत्रणेला जाग

Goa Illegal Sand Mining: म्हादई नदीच्या पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उत्खननाबाबत दै. ‘गोमन्तक’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सरकारी यंत्रणेला जाग आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: म्हादई नदीच्या पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उत्खननाबाबत दै. ‘गोमन्तक’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सरकारी यंत्रणेला जाग आली. वाळपई पोलिसांनी कुडशे, सत्तरी येथे कारवाई करत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळपई पोलीस, सत्तरी मामलेतदार तसेच सत्तरी उपजिल्हाधिकारी यांना बेकायदेशीर रेती उत्खनन प्रकरणी लेखी पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर वाळपई पोलिसांनी कुडशे, सत्तरी येथे अचानक छापा टाकला असता त्यांना कुडशे नदीपात्रात परवानगीशिवाय वाळू उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधितांवर वाळपई पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींमध्ये एक स्थानिक व चार कामगारांचा समावेश आहे.

अनेक दिवसांपासून सुरू होता उपसा

गेल्या अनेक दिवसांपासून सोनाळ, तार, सावर्डे, कुडणे तसेच इतर भागांत बेकायदेशीर रेती उत्खनन बिनधास्तपणे सुरू होते. विशेष म्हणजे, हे उत्खनन म्हादई नदीच्या खोल पात्रात होत असल्याने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, या संदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच सरकारी यंत्रणा जागी झाली आणि संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले.

जैवविविधतेला धोका

सध्या म्हादई नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून जैवविविधता नष्ट होत चालली आहे. गेल्या काही वर्षांत नदीपात्रात वारंवार पूरस्थिती निर्माण होत असून नदीकाठची झाडे-झुडपे नष्ट होत आहेत. त्यामुळे नदी व पर्यावरण दोन्ही गंभीर संकटात सापडले आहेत. गतवर्षी सावर्डे, सत्तरी येथे रेती उत्खनन करताना एका महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. तसेच यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. तरीही खुलेआम बेकायदेशीर रेती उत्खनन सुरूच असल्याचे चित्र होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

Firecracker Ban: फटाके उडवताय? सावधान! आतषबाजीवर पूर्ण बंदी, ख्रिसमस-नवीन वर्षाचा उत्साह थंड

VIDEO: दहशत आणि किंकाळ्या...! सिडनीतील जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अचानक गोळीबार, जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ; अनेक जखमी

SCROLL FOR NEXT