2 Arrested for Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Sand Extraction : पीर्णा येथे बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोघांना अटक; होडीही जप्त

कोलवाळ पोलिसांनी मामलेदार आणि खाण खात्याच्या अधिकार्‍यांसमवेत ही कारवाई केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sand Extraction : पीर्णा-बार्देश येथील शापोरा नदीत बेकायदा रेती उत्खनन करणार्‍या दोन मजुर कामगारांना अटक करीत होडी जप्त करण्यात आली. कोलवाळ पोलिसांनी मामलेदार व खाण खात्याच्या अधिकार्‍यांसमवेत ही कारवाई केली. उपलब्ध माहितीनुसार, ही कारवाई दि. 13 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता करण्यात आली.

शापोरा नदीत बेकायदेशीररित्या रेती उत्खनन होत असल्याची माहिती तपास यंत्रणांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार कोलवाळ पोलिस, बार्देशचे मामलेदार दशरथ गावस, खाण खाते व बंदर कप्तानच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या छापा टाकला. त्यावेळी पीर्णा येथे शापोरा नदीच्या पात्रात दोन संशयित हे होडीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करीत असल्याचे रंगेहाथ सापडले.

दादन सहानी (50) व अजय सहानी (42) हे दोघेही संशयित कामगार मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांनी 08.5 मीटर क्युबिक रेती उत्खनन केली होती, ज्याची किंमत 11050 इतकी होती. याप्रकरणी खाण विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक श्याम सावंत यांच्या तक्रारीनुसार, कोलवाळ पोलिसांनी रेतीच्या चोरीप्रकरणी भादंसंच्या 379 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच गोवा खनिज नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांही संशयितांना अटक केली. तसेच चोरीसाठी वापरलेली होडी जप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT