Dhamadwada Xeldem News Dainik Gomantak
गोवा

Xeldem: शेल्डेत खासगी जमिनीत अतिक्रमण करुन रस्ता बांधकाम, पोलिसांचे तक्रारीकडे दुर्लक्ष; 'बड्या' राजकारण्याचा सहभागाची चर्चा

Dhamadwada Xeldem: धामडवाडा-शेल्डे येथे खासगी जमिनीत बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून रस्ता बांधला जात असल्याची तक्रार शेल्डे येथील शिवाजी गावस देसाई यांनी केपे पोलिसांत दाखल केली होती.

Sameer Panditrao

केपे: धामडवाडा-शेल्डे येथे खासगी जमिनीत बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून रस्ता बांधला जात असल्याची तक्रार शेल्डे येथील शिवाजी गावस देसाई यांनी केपे पोलिसांत दाखल केली होती. मात्र, तीन दिवस उलटले तरी पोलिसांकडून तक्रारीबाबत कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूने हा बेकायदेशीर रस्ता करण्याचे काम जोमाने सुरू आहे.

गावस देसाई यांनी केपे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, धामडवाडा-शेल्डे येथील सर्व्हे क्रमांक ४०/१६, ४०/७ आणि ४०/१८ या जागेतून हा रस्ता बांधला जात आहे. ज्या जागेतून हा रस्ता बांधला जात आहे, ती जागा गावस देसाई यांच्या मालकीची असून यासंदर्भात न्यायालयात एक दावाही वर्ग करण्यात आलेला आहे.

Illegal Sand Mining

मागच्या वर्षी शेल्डे पंचायतीने या रस्त्याची निविदा काढली होती आणि हे काम असोल्डा येथील रॉकी फर्नांडिस या कंत्राटदाराला दिले होते. वास्तविक त्यावेळीच गावस देसाई यांनी आपला हरकतीचा अर्ज पंचायतीकडे दाखल केला होता. मात्र, त्याची दखल न घेता हे काम त्या कंत्राटदाराला देण्यात आले. हा रस्ता करण्यासाठी ही खासगी जमीन सरकारने संपादितही केलेली नाही किंवा जमीनमालकाकडून ना हरकत दाखलाही घेतलेला नाही.

गावस देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात त्यांनी केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयात तसेच दक्षता खात्याकडेही तक्रार दाखल केली. त्यानंतर मामलेदार कार्यालयातील भरारी पथकाने या जागेची पाहणीही केली होती. पण नंतर या सर्व अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आल्याने त्यांनी या तक्रारींकडे कानाडोळा केला.

तपास यंत्रणा गप्पच!

एका राजकीय व्यक्तीच्या फायद्यासाठी हा रस्ता तयार केला जात असून त्याला आणखी एक बड्या राजकारण्याचा आशीर्वाद आहे. या राजकारण्याकडून पोलिस व इतरांवर दबाव आणला जात असून त्यामुळेच सर्व तपास यंत्रणा मूग गिळून गप्प बसली आहे, असा आरोप शिवाजी गावस देसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT