Arrested Dainik Gomantak
गोवा

Cape News : गुरांची बेकायदा वाहतूक; केपेत दोघांना अटक

Cape News : यावेळी स्थानिकांनी याची माहिती केपे पोलिसांना दिली. केपे पोलिसांनी घटनास्थळी येऊन महंमद व लियाकतसह रिक्षा केपे पोलिस स्थानकात आणली.आज केपे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News :

केपे, असोल्डा-केपे येथे बेकायदेशीररित्या गुरांना घेऊन जाणारा रिक्षा स्थानिकांनी अडवून महंमद सादिक बेपारी (४२) व लियाकत बेपारी (४७)यांना केपे पोलिसांच्या स्वाधीन केले. आज त्यांना न्यायालयात उभे केले असता जामिनावर सोडून देण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार काल,दि.२६ रोजी रात्री एका रिक्षातून चार बैल घेऊन कुणीतरी चांदरहून कुडचडे मार्गे जात असल्याचे स्थानिक युवकांनी पाहिले. त्यानंतर सदर रिक्षा अडवून त्याची माहिती कुडचडे व शेल्डे येथील युवकांना दिली.

तेव्हा सदर युवकांनी रिक्षातून बैलांना घेऊन जाणाऱ्या महंमद व सादिक यांना सदर बैल कुठे घेऊन जात आहात, असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी चारही बैल बाणावलीतून आणले असून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

यावेळी स्थानिकांनी याची माहिती केपे पोलिसांना दिली. केपे पोलिसांनी घटनास्थळी येऊन महंमद व लियाकतसह रिक्षा केपे पोलिस स्थानकात आणली.आज केपे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: दक्षिण गोव्यात भाडेकरू आणि पर्यटकांची पोलीस पडताळणी अनिवार्य

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

Chimbel: 'प्रकल्प उभारा, पण संवेदनशील चिंबलमध्ये नको'! मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार, शिरोडकरांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT