खनिज वाहतूक  Dainik Gomantak
गोवा

पिसुर्लेत सर्रास अवैध खनिज वाहतूक

गोवा फाऊंडेशनची याचिका: 12 रोजी सुनावणी

दैनिक गोमन्तक

पणजी: ज्या भागात गेली 20 वर्षे खनिज उत्खनन झाले नाही. तेथील खनिज मालाची वाहतूक पिसुर्लेतून केली जात आहे, असा दावा करणारी जनहित याचिका गोवा फाऊंडेशनने सादर केली आहे. ही याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठ याच्यासमोर नोंदवण्यात आली असता त्यावरील सुनावणी येत्या 12 एप्रिलला ठेवण्यात आली आहे.

पिसुर्ले गावातून मोठ्या प्रमाणात खनिजवाहू ट्रक वाहतूक करत आहेत. या वाहतुकीमुळे तेथे होणारे धूळ प्रदूषण तसेच असलेला धोका हे गृहित धरून पिसुर्लेच्या लोकांनी आंदोलन केले होते.

या वाहतुकीसाठी खाण कंपन्यांनी परवानगी घेतलेली नाही असा दावा ग्रामस्थांनी करून वाहतूक रोखली होती. त्यावेळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी व डिचोली पोलिस निरीक्षक यांनी खनिजवाहू ट्रकांना पोलिस संरक्षण देत वाहतूक पुन्हा सुरू केली होती. यावेळी झालेल्या आंदोलनावेळी काही ग्रामस्थांना ताब्यात घेण्यात आले होते. गावातून वाहतुकीला परवाना नसताना ती कशी केली जाते असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता.

दरम्यान, या बेकायदा खनिजवाहू प्रकरणी गोवा फाऊंडेशनने जनहित याचिका सादर केली आहे. ज्या भागातून हा खनिज माल उचलून तो वाहतूक केला जात आहे तेथे गेल्या 20 वर्षात खनिज उत्खनन झालेलेच नाही. ही खनिजवाहू सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून करण्यात येत असल्याने त्याची चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादाराने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT