Illegal logging in sacorda goa forest Dainik Gomantak
गोवा

Goa News: साकोर्डा जंगलात खैराच्‍या झाडांची कत्तल

Goa News: साकोर्डा जंगलात खैराच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्‍यानंतर वन खात्याने शहानिशा केली असता खरोखरच तसा प्रकार घडल्‍याचे उघडकीस आले.

दैनिक गोमन्तक

Goa News:

साकोर्डा जंगलात खैराच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्‍यानंतर वन खात्याने शहानिशा केली असता खरोखरच तसा प्रकार घडल्‍याचे उघडकीस आले. त्‍यामुळे संशयितांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.

या टोळीचा म्होरक्‍या एका बड्या राजकीय व्यक्तीला जवळ त्‍याला जेरबंद करण्‍यास वन खात्याचे अधिकारी धजावणार नाहीत, अशी शक्‍यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी दुपारी भोमाकटा-कुंभारवाडा येथील जंगलात खैराच्या झाडाची कत्तल केल्याचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना आढळून आले असल्याने या परिसरातील लाकूड तस्करी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे. तर, म्होरक्या स्‍वत:ला कारवाईपासून वाचविण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींच्‍या संपर्कात आहे.

गेल्या आठवड्यात वाळपई वन विभागाने गुळेली येथे कारवाई करून एक सुमो जप्त केली. त्याचे कनेक्शन साकोर्डा भागात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. साकोर्डा भागातील एक टोळी बेकायदेशीर लाकूड तस्करीत गुंतल्याचा संशय स्थानिक लोक व्यक्त करीत होते. त्यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कुळे वन विभागाने गांभीर्याने लक्ष दिले होते.

आज बुधवारी जंगलात पाहणी करताना वन खात्याच्या अधिकाऱ्याना खैराची झाडे कत्तल केल्याचे आढळून आले. याप्रकरणी अजूनपर्यंत कुणालाच ताब्यात घेण्यात आलेले नाही. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT