Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: तोरसेत स्कॉर्पियोतून 3 लाखाचा मद्यसाठा जप्त

बेकायदा दारू वाहतूक, मोपा विमानतळ पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Crime News: गोव्यातून इतर राज्यात नेण्यासाठी आणलेला सुमारे तीन लाख रूपयांचा मद्यसाठी पोलिसांनी जप्त केला आहे. तोरसे या गावात मोपा विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली. ही सर्व दारू जप्त करण्यात आली आहे. संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मरून रंगाच्या स्कॉर्पियो (एमएच 07 Q 2424) मधून मद्याची ही चोरटी वाहतूक केली जात होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तोरसे येथीलमाऊली मंदीराजवळ ही गाडी अडवली. गाडीची तपासणी केली असताना गाडीत देशी-विदेशी ब्रँडच्या मद्याच्या अनेक बाटल्या आढळून आल्या.

एकूण सुमारे 300.24 लीटर मद्याचा साठी गाडीतून हस्तगत करण्यात आला आहे. याची बाजारपेठेतील किंमत सुमारे 3,00,000 रूपये इतका आहे. स्कॉर्पियोदेखील जप्त करण्यात आली आहे.

मोपा विमानतळ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद महाले, विनोद पेडणेकर, अनिषकुमार पोके आणि अस्तिक नाईक यांनी ही कारवाई केली.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्याचे दर स्वस्त असल्याने गोव्यातून नेहमीच मद्याची चोरटी वाहतूक किंवा तस्करी करण्याचा प्रयत्न होत असतो. तथापि, पोलिस देखील या तस्करीवर कसून नजर ठेऊन असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: केपे गणेशोत्‍सवाची लॉटरी ठरली 'हिट', काही तासांतच 1.5 लाख तिकिटांची विक्री

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; जिममध्ये आला हृदयविकाराचा झटका आला

Bardez: घरे नियमित करण्याचा निर्णय ऐतिहासिक, विरोधकांचा विरोध डावलून विधेयक मंजूर - दयानंद सोपटे

Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

देशवासीयांनो आता फक्त 'स्वदेशी' वापरा, वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT