President Malvin Fernandes Dainik Gomantak
गोवा

Illegal Houses In Aldona: हळदोणातील 60 बेकायदा घरांवर चालणार बुलडोझर, समिती ठाम; प्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी!

Supreme Court Demolition Order: हळदोणा पंचायत क्षेत्रातील रामतळे व साईनगर परिसरात कोमुनिदादच्या जागेत बेकायदा उभारलेल्या ६० घरांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: हळदोणा पंचायत क्षेत्रातील रामतळे व साईनगर परिसरात कोमुनिदादच्या जागेत बेकायदा उभारलेल्या ६० घरांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती बोआ इस्पेरेन्सा दि हळदोणा या कोमुनिदादचे अध्यक्ष मॅल्वीन फर्नांडिस यांनी दिली आहे.

कोमुनिदादची नूतन समितीची निवड झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी कोमुनिदादचे सदस्य मेलरॉय फेर्रांव अटर्नी, सावियो फर्नांडिस, बेंजामीन आल्फोंसो तसेच इतर सदस्य उपस्थित होते. निवडणूक (Election) अत्यंत शांतपणे झाल्याचे ते म्हणाले.

प्रसंगी न्यायालयात

घर कितीही जुने असले तरी त्यावरील कारवाई अटळ आहे. उभारलेल्या या घरांना ना हरकत दाखला कोमुनिदादकडून देण्यात आलेला नाही. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्याची तयारी ठेवली आहे. घरांवर कारवाई करताना तेथील मंदिराला हात लावला जाणार नाही. एका घरावर कारवाई केल्यानंतर सर्व घरांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT