Vasco Illegal Handcart Vendors
वास्को: विनापरवाना हातगाडेवाल्यांनी रस्त्यांवर अतिक्रमणे केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. मुरगाव पालिका कार्यालय इमारतीपासून अवघ्या काही पावलांवर हे हातगाडे उभे केले जातात. या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. मुरगाव पालिकेने विनापरवाना हातगाडेवाल्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
येथे विनापरवाना हातगाडेवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते शहरात निरनिराळ्या ठिकाणी हातगाडे लावून साहित्याची विक्री करतात. यापूर्वी मुरगाव पालिकेने विनापरवाना हातगाडे जप्त करण्याची मोहीम सुरू करून परवाना नसलेले हातगाडे जप्त केल्याने रस्ते मोकळे झाले होते.
कुन्हा चौकात हातगाड्यांनी त्यांना आखून दिलेल्या जागा सोडून रस्त्यावरच आक्रमण केले आहे. ते हातगाडेवाले कोणाला जुमानत नाहीत. याप्रकरणी पालिका निरीक्षक, अधिकारी कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे तेथे वाहनांना मोठा अडथळा होत आहे. त्यांच्याविरोधात कारवाई न करण्यामागे कोणते अर्थकारण आहे ते समजण्यास मार्ग नाही. काहीवेळा हे हातगाडेवाले आपली जागा सोडून पूर्वीच्या सिने वास्को चौकात हातगाडे उभे करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.