Aquem Baixo Panchayat demolished all illegal Structures and Gaddas along road side at Margao Quepem road. Dainik Gomantak
गोवा

Demolition Drive: दादागिरी काढली मोडून; आके बायश येथे बेकायदेशीर गाड्यांवर पंचायतीने चालवला बुलडोझर

Salcete, Goa Demolition Drive: या गाड्यांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांची या परिसरात दादागिरीही वाढली होती.

Pramod Yadav

सासष्टी: आके बायश पंचायतीने आज आपल्या क्षेत्रातील बेकायदेशीर गाडे पाडण्याचे काम केले. शुक्रवारी (२७ डिसेंबर) सकाळी बुलडोझरद्वारे तीन गाडे जमिनदोस्त करण्यात आले. हे गाडे वाहतुकीला अडथळा ठरत होते. त्याचप्रमाणे यापूर्वी पंचायत क्षेत्रातील सर्व बेकायदेशीर गाडेवाल्यांना नोटीसाही पाठविल्या होत्या.

Aquem Baixo Panchayat demolished all illegal Structures and Gaddas along road side at Margao Quepem road.

यासंदर्भात सरपंच इनासियो ऊर्फ डॅनी डायस यांने सांगितले, की आम्ही त्यांना गाडे हटविण्यासाठी विनंती केली होती. कित्येकांनी आपले गाडे यापूर्वीच हटविले होते. आम्ही कुणालाही नाहक त्रास देणार नाही, पण या गाड्यांचा खरोखरच सर्वांनाच त्रास होत होता.

स्थानिक पंच अमिशा तिळवे यांनी सांगितले, की आमच्याकडे या गाड्यांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांची या परिसरात दादागिरीही वाढली होती. ही दादागिरी आणखी वाढू नये व लोकांना त्रास होऊ नये म्हणून ही कारवाई करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: कामतांना पीडब्ल्यूडी, तवडकरांना क्रीडा? मुख्यमंत्र्यांचा नेमका कौल काय? गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Vasai: गोवा काबीज करून, 'अल्बुर्क' भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला; पोर्तुगीज वसई प्रांतात व्यापार करू लागले

Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

Mumbai Goa Highway Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना, मालवणला जाणारी बस जळून खाक; चाकरमानी थोडक्यात बचावले

Indian Tribes: 'आफ्रिकेतून बाहेर पडलेले मानव भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याने गेले असतील'; वेतुवन, इरुला आणि कुरुंबार

SCROLL FOR NEXT