Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: बेकायदा बांधकाम 'जमीनदोस्त'; पोलिस बंदोबस्तात पंचायतीची कारवाई

Calangute Panchayat Board: खोब्रावाडा-कळंगुट येथे भाटकाराच्या जमिनीत बेकायदा उभारलेल्या तीन पक्क्या खोल्या बुधवारी दुपारी पंचायत मंडळाने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: खोब्रावाडा-कळंगुट येथे भाटकाराच्या जमिनीत बेकायदा उभारलेल्या तीन पक्क्या खोल्या बुधवारी दुपारी पंचायत मंडळाने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी बार्देश तालुक्याचे मामलेदार, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक पंचायत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

या जमिनीचे मालक इजिदिओ यांनी आपल्या जमिनीत दिवकर नामक इसमाने जबरदस्तीने बेकायदा खोल्या उभारल्याची तक्रार कळंगुट पंचायत कार्यालयात केली होती. या खोल्यांमध्ये परप्रांतीय मजूर वास्तव्यास होते. न्यायालय तसेच म्हापसा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात यावर युक्तिवाद झाल्यानंतर हे बेकायदा बांधकाम (खोल्या) तात्काळ पाडण्याचे आदेश स्थानिक पंचायतीला न्यायालयाने दिले. त्यानुसार ही कारवाई केल्याचे पंचायत सचिव अर्जुन वेळीप यांनी सांगितले.

दुसरीकडे, वास्को शहरात तसेच इतर भागात बेकायदेशीर बांधकामांना ऊत आला असून संबंधितांचे यावर नियंत्रण नसल्यानेच अशा कामांना ऊत येतो. यानंतर कोणी एकाने बेकायदेशीर कामाविषयी आवाज उठविला की मग धावपळ सुरु होते व कारवाईची गदा येते हे नक्की. असाच प्रकार ओरुले वास्को येथे घडला आहे. जितेंद्र बोरकर यांनी केलेल्या बेकायदा बांधकामावर न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली.

गेल्या दिड वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयीन होते. येथील जागेत रस्त्याच्या शेजारी अतिक्रमण करून संरक्षक भिंत बांधून जितेंद्र बोरकर यांनी जागा बळकावली होती. याविषयी पालिकेत तक्रार दाखल करण्यात आली होती. शेवटी प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता जितेंद्र बोरकर यांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करून आज पाडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT