Anjuna Gomantak Digital Team
गोवा

Anjuna Illegal Construction: हणजूणमधील 9 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त!

बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना पंचायतीने कारणे दाखवा नोटीस बजावली

गोमन्तक डिजिटल टीम

Anjuna Illegal Construction : गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थानिक पंचायतीसह हणजूण पंचायत क्षेत्रातील नॉन डेव्हलपमेंट झोनमधील नऊ बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे काम हाती घेतले. बुधवारपासून ती पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हणजूण पंचायत क्षेत्रात सुमारे ३८ बांधकामे आहेत. जी सीआरझेड नियमांचे उल्लंघन करतात. यावेळी मजूर आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने ही बांधकामे पाडण्यात येत आहेत.सीआरझेडच्या निकषांचे उल्लंघन करून बांधलेल्या पाच बांधकामांवर डेमोलिशन पथकाने गुरुवारी (ता. ११) हातोडा फिरवला, तर बुधवारी चार बांधकामे पाडण्यात आली आणि एकाला न्यायालयाकडून स्थगिती मिळविली.

हणजूण पंचायतीचे सरपंच लक्ष्मीकांत चिमुलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणासह सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करणारी बेकायदा बांधकामे पाडण्याचे काम केले जात आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाहणी करण्यात आली. ज्यामध्ये बेकायदेशीर बांधकामे ओळखण्यात आली. त्याचप्रमाणे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना पंचायतीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT