Patnem Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Patnem Illegal Construction: पाटणेत वाट अडवून अवैध बांधकाम

Patnem Illegal Construction: ७ दिवसांत कारवाई न केल्यास रस्ता खुला करू; नगरसेवक कोमरपंत

गोमन्तक डिजिटल टीम

Patnem Illegal Construction: कोळंब, पाटणे येथे स्थानिकांची पारंपरिक वाट (रस्ता) अडविलेली असून याठिकाणी माडांची व झाडांची कत्तल करून बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात येत आहे. याविरुद्ध ७ दिवसांत कारवाई करा. अन्यथा आपण खुद्द स्थानिकांसह हा रस्ता मोकळा करू,असा इशारा स्थानिक नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी काल घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना दिला.

यावेळी पालिका अभियंता व १०० च्या आसपास स्थानिक नागरिक उपस्थित होते. पालिका अभियंत्याने यावेळी सदर जागेचे निरीक्षण करून बांधकामाचे मोजमाप करून नोंद करून घेतली.

नगरसेवक कोमरपंत पुढे म्हणाले की, आपण यासंबंधीचे एक निवेदन काणकोण पालिका, उपजिल्हाधिकारी कार्यालय, यांना सादर करून कारवाईची मागणी केली आहे. याठिकाणी जोरदार पाऊस सुरू असताना प्लास्टिकचे कुंपण उभारले, लोकांना त्रास करून याठिकाणी व्यवसाय आम्ही करू देणार नाही. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर मातीचा भराव घातला.७ शॅक कुटीरे बांधून पूर्ण केली, नाव ठेवण्याच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे.

दीपक पागी म्हणाले की, याठिकाणी ‘सीआरझेड’ सीमांकनाचा दगड गायब करण्यात आला आहे. अनेक माड व आकेशिया झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

माजी उपनगराध्यक्ष गुरू कोमरपंत म्हणाले की याचा उपयोग समाज बांधव मच्छीमार जाळे व अन्य कामांकरता करीत‌. ही शेकडो वर्षांपूर्वीची महत्वाची पायवाट असल्याने २५ वर्षापूर्वी तत्कालीन नगरसेवक तुबकी यानी डांबरीकरण करून हा रस्ता केला. हा सुरक्षित रस्ता असून स्थानिक याचाच उपयोग करीत असत.नावांची याच रस्त्याने दुरुस्तीसाठी ने-आण सगळे बांधव करीत आले आहेत. त्यामुळे आमचा रस्ता जमीन मालकाने त्वरित मोकळा करावा, अशी आमची मागणी आहे.

आपण कुणाचीच वाट अडवली नाही!

दरम्यान, जमीन मालकाने स्वत: पत्रकारांना संपर्क करून सांगितले की आपण कुणाचीच वाट किंवा रस्ता अडविलेला नाही. कसलेच बांधकाम बेकायदेशीर केलेले नाही. झाडे तोडलेली नाहीत. जे काम केले आहे ‘सीआरझेड’शी परवानगी घेऊन केलेले आहे. ते योग्य कायदेशीरपणे केलेले असून आपल्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत. नाहक आपल्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. आपल्याला आज स्थानिक याठिकाणी येणार याची पूर्वकल्पना दिली असती तर मी स्वतः आलो असतो. आपल्या जमिनीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला म्हणून कायदेशीर कारवाई करू शकलो असतो मात्र आपल्याला ते नको आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT