Illegal transportation of cattle Dainik Gomantak
गोवा

Dodamarg: दोडामार्गात 15 गाईंसह 5 वाहने जप्त, बजरंग दलाची कारवाई; गोव्यातून कर्नाटकात होत होती बेकायदेशीर वाहतूक

Illegal Transportation of Cattle: गोव्यातून कर्नाटकात बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणारी पाच वाहने दोडामार्ग (महाराष्ट्र) पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: गोव्यातून कर्नाटकात बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणारी पाच वाहने दोडामार्ग (महाराष्ट्र) पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या वाहनांमधून जर्सी मिळून पंधरा गायी होत्या. या गायीसह पाचही वाहनचालकांना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार ही गुरे कर्नाटकमधील बेळगाव येथे नेण्यात येत होती. या गायी कत्तलखान्यात नेण्यात येत होती. असे समजते.

महाराष्ट्र सीमेवर दोडामार्ग येथे पाळत ठेवून असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयावरून अडवली असता, कर्नाटक राज्यात नोंदणी झालेल्या मिनी टेम्पो मिळून पाचही वाहनात गुरे असल्याचे आढळून आले. ही गुरे शेतकऱ्यांना विकण्यासाठी नेण्यात येत होती, असे वाहनचालकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

मात्र त्यांच्याकडे कायदेशीर परवाना किंवा अन्य कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. नंतर ही वाहने अडवून दोडामार्ग-महाराष्ट्र पोलिसांना कळविण्यात आले. बजरंग दलाचे दोडामार्ग विभागाचे संयोजक नीळकंठ फाटक यांच्या नेतृत्वाखाली बजरंग कार्यकर्त्यांनी ही कारवाई केली.

कत्तलीसाठी वाहतूक

या प्रकाराची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारवाई सुरू केली. गायीसह पाचही वाहने जप्त करून वाहनचालकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी पंचनामा करून जप्त केलेल्या गुरांची गोशाळेत रवानगी केली आहे. ही गुरे कर्नाटकात कत्तलीसाठी नेण्यात येतात, असा गौप्यस्फोट बजरंग दलाचे दोडामार्ग विभागाचे संयोजक नीळकंठ फाटक यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT