Beef Smuggling: जेथून बीफ डिलिव्हरी, तेथे आधीच सेटिंग! माफियांचा शोध लागेना; रेल्वे पोलीस हतबल

Beef Transport in Goa: तस्करीत गुंतलेल्या माफियांचे जबरदस्त नेटवर्क असून मांडवली करण्यातही ते माहीर आहेत. जेथून मालाची डिलिव्हरी केली जाते तेथे सर्व आधीच सेटिंग केलेले असते.
Konkan Railway Smuggling
Goa Beef SmugglingDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रेल्वेतून सर्रास गोव्यात परराज्यातून बीफची तस्करी होत असताना, यात गुंतलेले माफिया मात्र अजूनही मोकाट आहेत. पोलिसांचे हात अजून त्यांच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. पुरवठादाराचा माग काढणे पोलिसांना शक्य झालेले नाही.

या तस्करीत गुंतलेल्या माफियांचे जबरदस्त नेटवर्क असून मांडवली करण्यातही ते माहीर आहेत. जेथून मालाची डिलिव्हरी केली जाते तेथे सर्व आधीच सेटिंग केलेले असते. बिनधास्त माल गोव्यात पाठविला जातो हे आता उघड होऊ लागले आहे. 

गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असून येथे बीफला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी तसा पुरवठा होत नसल्याने आता बीफची तस्करी होऊ लागली आहे. यावर्षी दोनदा कोकण रेल्वे पोलिसांनी रेल्वेतून आलेले बीफ जप्त केले आहे. दिल्लीहून हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस रेल्वेतून मडगाव रेल्वे स्थानकात  पार्सलमधून आलेले १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे बीफ या पोलिसांनी जप्त केले होते.

Konkan Railway Smuggling
Beef Smuggling: "कागदपत्रं दाखवल्याशिवाय कंटेनर सोडणार नाही"; मोले चेकपोस्टवर केसरिया हिंदू वाहिनीने पकडले 7 टन गोमांस

चिकनचे लेबल लावून हा माल पाठवून दिला होता. या मालाची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेला फय्याज अहमद मोहम्मद हनीफ याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे. या प्रकरणाचा पुढील तपासासाठी पोलिसाचे एक पथक दिल्लीला गेले होते. तेथील रेल्वे पार्सल कार्यालयाच्या बड्या अधिकाऱ्यांची या पोलिसांनी चौकशी केली. मात्र ठोस माहिती काही त्यांना मिळू शकली नाही. 

Konkan Railway Smuggling
Beef Smuggling: गुढी पाडव्याच्या दिवशी मडगावात 300 किलो मांस जप्त; माशांसोबत गोमांसाची भेसळ

दुसऱ्या एका घटनेत शेजारच्या कर्नाटक राज्यातील बेळगावहून गोवा एक्स्प्रेस रेल्वेतून शेळीचे मास असे भासवून बीफ पाठवून देण्यात आले होते. मडगाव रेल्वे स्थानकावर नंतर ते जप्त करण्यात आले होते. ३४७ किलो ते मास होते. या प्रकरणी अजूनही पोलिसांना कुणीही सापडू शकला नाही. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणाहून बीफ पाठविले जाते, तेथे सर्व काही आधीच सेटिंग झालेले असते. आम्ही माल जप्त करून, पुढील तपास सुरु केला तरी आम्हाला तेथून पूर्ण सहकार्य मिळत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com