डिचोली : डिचोलीतील (Bicholim) नार्वे भागात स्फोटके वापरून बेकायदा डोंगरकापणी करण्यात येत आहे. या स्फोटकांच्या धक्क्याने घरांच्या भिंतीना तडे जात आहेत. कोनाटीवाडा-नार्वे भागातील तीन ते चार घरांच्या भिंतींना अशा प्रकारे तडे गेले आहेत. तसेच रात्री-अपरात्री कानठळ्या बसविणारे स्फोट घडवून आणण्यात येत असल्याने झोपमोड होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
कोनाटीवाडा येथील लोकवस्तीपासून देवगाळी भागात बेकायदा डोंगरकापणी चालू आहे. हा डोंगर फोडण्यासाठी सर्रासपणे जिलेटिन स्फोटके वापरण्यात येत आहेत. स्फोटकांमुळे परिसरात प्रचंड हादरे बसत असून, आपल्या घरांसह अन्य तीन ते चार घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, अशी माहिती कोनाटीवाडा येथील एक नागरिक (Citizen) उदय पडोलकर यांनी दिली. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पडोलकर यांनी सांगितले की, डोंगरकापणीबाबत आपण संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधला. त्याने दिलेल्या माहितीनुसार गावातील शेटगावकर नामक व्यक्तीशी संपर्क साधला. मात्र त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संबंधित यंत्रणेने या प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन बेकायदा डोंगरकापणी थांबवावी आणि आमच्या घरांचे रक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.