Illegal Activities on Beach Dainik Gomantak
गोवा

Illegal Activities on Beach: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर अवैध धंद्याना ऊत! पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

पर्यटकांना लुटणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.

Kavya Powar

Illegal Activities on Beach

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती गोव्यातील किनारपट्टीला असते. त्यामुळेच तिथे अनेक अवैध घटनाही घडत असतात. अशातच पर्यटकांना लुटणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.

ओपन बॉडी मसाज, फेरीवाले आणि दलाल यांचे अवैध प्रकार किनारपट्टीवर पाहायला मिळत आहेत. पोलिसांचे दुर्लक्ष हेच या प्रकारांना वाढवत असल्याचे सध्या म्हटले जात आहे. माहितीनुसार, अवैध मसाज करणारे इथे येणाऱ्या प्रत्येक देशी पर्यटकाकडून 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत शरीराच्या मसाजसाठी गंडा घालत आहेत.

दुसरीकडे त्रासदायक फेरीवाले आणि दलालही तितकेच सक्रिय झाले आहेत. या अवैध कृत्यांमध्ये गुंतलेले सर्व स्थलांतरित असून त्यांनी गोव्यातील किनारपट्ट्यांवर आपला तळ ठोकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बरेच दलाल हे राज्य पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत असल्याचा दावा करतात.

पर्यटन किंवा आयआरबीचे कर्मचारी या घटनांवर कारवाई करण्याबाबत गंभीर दिसत नाहीत. डोळ्यांदेखत अवैध घटना घडूनही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत विचारणा केली असता, गोवा पोलिसांनी आपल्याला यासाठी सर्वस्वी जबाबदार ठरवता येणार नाही, असे म्हणत हात झटकल्याचे सांगण्यात येते.

या बेकायदेशीर हालचाली आढळल्यावर संबंधित IRB कर्मचार्‍यांनी समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेल्या पर्यटन अधिकाऱ्याला अहवाल सादर करणे आवश्यक आहे. मात्र त्यानंतर हा अहवाल उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे फेरीवाले, दलाल किंवा मालिश करणारे पळून जातात.

बहुतांश घटना या पर्यटकांनी गजबजलेल्या कळंगुट-बागा पट्ट्यात आढळतात. कारण इथे शॅक आणि नाईट-आउट क्लबची संख्या जास्त आहे. हे बेकायदेशीर प्रकार थांबवण्यासाठी पर्यटन विभाग आणि सरकारने ठोस पावले उचलवीत, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT