गोवा

Painless Injections: आता सुईशिवायही मिळणार इंजेक्शन; आयआयटी मुंबईकडून ‘शॉकवेव्ह सिरींज’ विकसित

Shockwave Based Needle Free Syringe: ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हाइसेस’मध्ये हा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Shockwave Based Needle Free Syringe

मुंबई: इंजेक्शन म्हटले की टोचल्याच्या वेदना होणार असे डोक्यात येते. मात्र मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे. संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरींज विकसित केली आहे.

या सिरींजच्या साहाय्याने दाब देऊन शरीरात इंजेक्शन देता येते यामुळे दुखापत आणि संसर्गाचा धोका देखील कमी होईल असा संशोधकांचा दावा आहे. डॉक्टर मानवी शरीरात औषधे पोहोचवण्यासाठी इंजेक्शन वापरतात; पण सुईची अनेकांनी भीती असते त्यामुळे अनेकदा लहान मुलांना लसीकरण करणे कठीण होते. मधुमेही ज्यांना नियमितपणे इन्सुलिन घ्यावे लागते तेही यासाठी टाळाटाळ करतात.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक वीरेन मेनेजेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ‘शॉक सिरींज’चा वापर करून सुई न टोचता शरीरात औषधे पोहोचविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांचा अभ्यास अहवाल ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरिअल्स अँड डिव्हाइसेस’मध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात त्यांनी -शॉक सिरिंजद्वारे दिलेले औषध आणि प्रयोगशाळेतील उंदरांवर इंजेक्शनच्या सुईने इंजेक्शन दिलेल्या औषधाची तुलना केली.

शॉक सिरींजची कार्यप्रणाली

नियमित सुई असलेली सिरींज त्वचेला छिद्र करते तर शॉक सिरिंजमध्ये ही समस्या नसते. त्याऐवजी ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणाऱ्या उच्च-ऊर्जा शॉक वेव्हचा वापर त्वचेला छिद्र पाडण्यासाठी केला जातो. जेव्हा या लहरी निर्माण होतात तेव्हा त्या आजूबाजूचे माध्यम जसे की हवा किंवा पाण्याला प्रेशर करतात.

प्रेशराइज्ड नायट्रोजन वायू औषधाने भरलेल्या शॉक सिरिंजवर दाब लागू करून द्रव औषधाचा बारीक स्प्रे तयार करतो. या स्प्रेचा वेग विमानाच्या टेक-ऑफच्या वेगापेक्षा दुप्पट असतो. द्रव औषधाची ही फवारणी सिरिंजच्या तोंडातून बाहेर पडते आणि त्वचेत जाते. ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळण्यापूर्वी अतिशय वेगाने घडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT