The main water tank surrounded by bushes. Dainik Gomantak
गोवा

चांदेल पाणी प्रकल्पाच्या टाकीकडे दुर्लक्ष

स्वच्छता राखण्याची मागणी: झाकणे उघडी असल्याने धोक्याला निमंत्रण

दैनिक गोमन्तक

मोरजी: चांदेल पाणी प्रकल्पाची मुख्य टाकी डोंगराळ भागात असून, टाकीचा चेंबर उघडा आहे. शिवाय टाकीच्या परिसरात झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या टाकीची स्वच्छता राखावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. चांदेल पाणी प्रकल्पातून पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पाणी थेट दीड किलोमीटर लांबीवर असलेल्या डोंगरावरील टाकीत सोडले जाते. या टाकीतून पेडणे तालुक्यातील 18 हजार घरगुती नळांना पाणी पुरवले जाते.

भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जलस्रोत विभागाने याकडे लक्ष देऊन टाकीला सुरक्षा द्यावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या टाकीच्या वरच्या बाजूला असलेल्या दोन छिद्रांनाही झाकण घालण्यात आलेले नाही. तसेच सुरक्षारक्षकाला ठेवण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. या टाकीच्या खालच्या बाजूने मोठ्या प्रमाणात खडी क्रशरसाठी लागणाऱ्या खडीचे डोंगर जिलेटिन घालून फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या ठिकाणी सतत मजुरांची ये-जा सुरू असते. त्यामुळे स्थानिकांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पेडणे तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा होत नसल्याचे नाराजी व्यक्त केली जात आहे. मांद्रेतील केरी, पालये, हरमल, आगरवाडा, पार्से, तुये या भागात पाण्याची समस्या जाणवत आहे.

पेडणेत आवश्‍यक जलसाठा!

पेडणे तालुक्यातील लाखभर लोकसंख्येसाठी आवश्यक तो जलसाठा गावागावात ठिकठिकाणी आहे. मात्र त्याचा वापर होत नाही. पूर्वी मोठ्या प्रमाणात गावागावांत विहिरी होत्या. परंतु कालांतराने त्या विहिरी बंद होऊन केवळ नळाच्या पाण्यावर लोक अवलंबून राहत आहेत. त्यामुळे पाणीटंचाई भासत आहे. चांदेल प्रकल्प उभारला; मात्र त्याचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. पाच वर्षांपूर्वी आणखी अतिरिक्त 15 एमएलडी पाणी प्रकल्प उभारण्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र चार वर्षे या कामाचा पाठपुरावा झाला नव्हता. गेल्या वर्षीपासून या कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील लोकांना किमान 30 एमएलडी पाण्याची गरज असून, दिवसाकाठी 15 एमएलडी पाणी सोडले जात आहे. पेडणेतील लोकसंख्या लाखभर असून, त्यासाठी हे पाणी पुरेसे ठरत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी

चांदेल पाणी प्रकल्पातून पूर्ण तालुक्याला पाणी सोडले जाते; मात्र त्यावर व्यवस्थित प्रक्रिया होते की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मुख्य टाकीची झाकणेच उघडी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पाण्यात क्लोरिन घातले जाते का, त्याचा साठा व्यवस्थित आहे का, याची प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

कोणत्या गावात किती नळ जोडण्या?

पार्से.......................932

आगरवाडा................1011

चोपडे.....................618

मोरजी....................2004

मांद्रे......................2365

केरी तेरेखोल...............124

हरमल....................1379

पालये.....................619

हळर्ण......................369

कासारवर्णे.................300

खाजणे....................576

पेडणे पालिका क्षेत्र.......1192

उगवे.......................562

वारखंड....................624

कोरगाव..................1534

विर्नोडा....................618

वझरी......................419

हसापूर.....................440

हणखणे...................475

तोरसे......................581

एकूण..................18456

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT