IFFI 2022 V. Vijayendra Prasad Masterclass
IFFI 2022 V. Vijayendra Prasad Masterclass Dainik Gomantak
गोवा

V. Vijayendra Prasad in IFFI Masterclass : मी कथा चोरतो! असं का म्हणतायत बाहुबली, RRR चे लेखक?

Kavya Powar

IFFI 2022 V. Vijayendra Prasad Masterclass : 20 नोव्हेंबरपासून 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) गोव्यामध्ये सुरुवात झाली असून आजचा दुसरा दिवस होता. इफ्फीमध्ये देश-परदेशातील चित्रपटांच्या मेजवानीबरोबरच विविध विषयांवर दिग्गजांचे मास्टर क्लास सुद्धा आयोजित करण्यात येतात.

आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत आणि ज्येष्ठ लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचे The Master’s Writing Process या विषयावर मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले होते. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी तेलगू, हिंदी, कन्नड तसेच तमिळ चित्रपटांसाठी लेखक म्हणून काम केले आहे. (IFFI 2022 V. Vijayendra Prasad Masterclass)

V. Vijayendra Prasad in IFFI Masterclass

त्यांच्या कारकीर्दीतील अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले असून यामध्ये बाहुबली, आरआरआर, बजरंगी भाईजान, मगाधीरा अशा अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा समावेश होतो. नव्यानं लेखक म्हणून काम करू इच्छित असणाऱ्या तरुणांना संबोधित करताना त्यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक मजेशीर अनुभव सांगितले. बाहुबली, RRR चित्रपट बनण्यामागची प्रक्रिया यावेळी त्यांनी नमूद केली. आजच्या मास्टरक्लासचे सूत्र संचालन चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.

त्यांच्यामते उत्कृष्ट लेखक तोच जो उत्कृष्ट खोटं बोलू शकतो. ते म्हणतात की, मी कथा लिहीत नाही; मी कथा चोरतो. (I don’t write stories, I steal stories) त्यामुळेच उत्कृष्ट कथा निर्मिती मी करू शकतो. ज्यावेळी मी कोणत्याही चित्रपटासाठी, कोणत्याही दिग्दर्शकासाठी कथा लिहित असतो त्यावेळी मी त्या कथेचा ट्विस्ट आधीच डोक्यात तयार करतो आणि त्यानुसार त्या कथेची निर्मिती करतो.

V. Vijayendra Prasad in IFFI Masterclass

प्रेक्षक या कथेला कोणत्या नजरेने पाहतील हे आधीच मी माझ्या डोक्यात ठरवून ठेवलेलं असतं, त्याप्रमाणे कथा मी तयार करत जातो. ते पुढे म्हणाले, एक लेखक म्हणून आपल्याला अशी कथा निर्माण करावी लागते जी भलेही खोटी असेल पण ती प्रत्येक प्रेक्षकाला बघताना सत्य घटनाच वाटली पाहिजे; तरच आपण उत्तम लेखक म्हणून जगासमोर येऊ शकू.

या दरम्यान उपस्थित असलेल्या अनेक नवोदित लेखकांनी विजयेंद्र प्रसाद यांच्याशी संवाद साधला. त्यांना काही प्रश्न विचारले. या लेखकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, तुमची कथा प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हालाच समीक्षक म्हणून विचार करावा लागेल. जे चूक आहे ते सुधारावे लागेल आणि जोपर्यंत तुमची कथा सर्वतोपरी तुम्हाला खरी आणि तुमच्या मनाला भिडत नाही तोपर्यंत ती प्रेक्षकांनाही आवडणार नाही.हे साधं गुपित उत्कृष्ट कथा निर्माण करण्यासाठी पुरेसं आहे.

V. Vijayendra Prasad in IFFI Masterclass

तुम्हाला शून्यातून कथा निर्माण करावी लागते. तुम्हांला खऱ्यासारखे दिसणारे खोटे जग निर्माण करावे लागते. जी व्यक्ती चांगल्या प्रकारे खोटे बोलू शकते तीच उत्तम कथा होऊ शकते. एका उत्तम लेखकाला दिग्दर्शक, निर्माता, प्रमुख पात्रे आणि प्रेक्षक अशा सर्वांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात. आणि त्यातून कलानिर्मिती करावी लागते.

व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सर्वोत्कृष्ट कथा-पटकथा लिहिल्या आहेत. ते प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे वडील आहेत. आजच्या या सत्रात सहभागी होण्यासाठी अनेका नवोदित लेखकांनी आणि लेखन क्षेत्राशी संबंधितांनी हजेरी लावली होती. (IFFI 2022 Latest Updates)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT