IFFI Goa 2025 Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

IFFI: यंदाच्या इफ्फीच्या उद्‍घाटनच्या चित्रपटाच्या ''शो''चे गोव्यातील अनेक सिनेकर्मींना आमंत्रण पोहोचले नसल्याबद्दल फिल्म मेकर्स या गोव्यातील चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: यंदाच्या इफ्फीच्या उद्‍घाटनच्या चित्रपटाच्या ''शो''चे गोव्यातील अनेक सिनेकर्मींना आमंत्रण पोहोचले नसल्याबद्दल फिल्म मेकर्स या गोव्यातील चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली असून हा महोत्सव नेमका आहे तरी कोणाकरता असा सवाल केला आहे.

या संघटनेचे अध्यक्ष मिलिंद म्हाडगुत यांनी गेल्या वर्षापर्यंत उद्‍घाटन व समारोप चित्रपटाच्या खेळाचे निमंत्रण मनोरंजन संस्था नोंदणीकृत स्थानिक सिनेकर्मींना वेळेवर पाठवीत असे. मात्र यंदा अनेक चित्रपट निर्माते व कलाकार यांना उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे आमंत्रण पोहोचले नसल्याचे सांगून यातून मनोरंजन संस्था आता एक नवा पायंडा रचत असल्याचे म्हटले आहे.

यामुळे हा आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणजे स्थानिक कलाकारांचा उपमर्द करण्याचे ठिकाण असे वाटायला लागले आहे. आधीच या महोत्सवात गोव्यातील सिने कलाकारांची उपेक्षा होत असताना आता साध्या चित्रपटांच्या खेळांना

सुद्धा न बोलावून स्थानिक सिनेकर्मींच्या जखमांवर मीठ चोळले जात आहे, असे म्हाडगुत यांनी म्हटले आहे. गोव्यातील सिने कलाकार या महोत्सवाचे यजमान असून सुद्धा त्यांना दुय्यम स्थान देणे यातूनच मनोरंजन संस्थेची स्थानिक कलाकारांप्रति असलेली सापत्न वागणूक अधोरेखित होते, असे त्यांनी म्हटले आहे.

एरव्ही प्रत्येक प्रांतात गोमंतकीयांना उदो उदो करणारे सरकार इफ्फीत मात्र गोव्यातील कलाकारांना मागच्या बाकावर बसवून बाहेरच्या कलाकारांना 'प्रोजेक्ट' करू पाहत आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी यात त्वरित लक्ष घालून स्थानिक सिनेकर्मीची चाललेली ही परवड थांबवावी, अशी मागणी म्हाडगुत यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bordem: 'हा आमच्या जीवाशी खेळ'! बोर्डे-डिचोलीत गटारात टाकली जलवाहिनी; संतप्त नागरिकांनी काम पाडले बंद Video

Fake Parcel Scam: फेक पार्सल स्कॅमचा पर्दाफाश! ओडिशातील एकाला अटक; संशयिताच्या फोनतपासणीत धक्कादायक बाबी समोर

Goa Accident: 'हा माझ्या मुलाला संपवण्याचा कट'! करमळी आंदोलनातील पंचसदस्याचा भीषण अपघात; कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

Pernem: पेडणेतील जमीन रूपांतरणाचा विषय! आमदार जीत-मंत्री राणे आमनेसामने; नगरनियोजन मंत्र्यांनी दावा खोडला

Goa Nightclub Fire: दुःख..अश्रू आणि लढा! हडफडेप्रकरणी लुथरा बंधूंच्‍या अर्जावर सुनावणी; मृतांच्या तसबिरी घेऊन जोशी कुटुंब न्यायालयात

SCROLL FOR NEXT