Balloon Tent Theater Sankhlim IFFI Goa 2024 Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: राज्यात फिल्म फेस्टिव्हल तर साखळीत 'बलून टँट थिएटर'; सिनेरसिकांसाठी पर्वणी

Balloon Tent Theater Sankhlim: बलून टँट थिएटरचे पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सलक्षणा सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Akshata Chhatre

साखळी: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची बरीच चर्चा सुरु आहे. बुधवारी पणजीतील शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले आणि यानंतर आता गुरुवारी (दि. २१ नोव्हेंबर) रोजी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अनुषंगाने साखळीत साकारण्यात आलेल्या बलून टँट थिएटरचे पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

"बलून टँट थिएटरचे उद्घाटन करताना गोव्यात चित्रपट संस्कृती रूजत असताना युवा पिढीने व विद्यार्थ्यांनी चित्रपट लेखन, दिग्दर्शन या कलेत पुढे यावे. या क्षेत्रात आता मोठे भविष्य घडणार आहे.

डिचोली तालुक्यातील दोन युवा कलाकारांनी फिल्म क्षेत्रात मोठे यश देखील मिळविले आहे आणि याचीच प्रेरणा घेत गोमंतकीय युवांनीही या क्षेत्रात उतरावे" असे सुलक्षणा सावंत म्हणाल्या.

साखळीत सुरु झालेल्या या अनोख्या थिएटरचे निर्माण साखळीतील सरकारी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे आणि फिल्म फेस्टिव्हलच्या संपूर्ण काळात म्हणजेच २८ नोव्हेंबर पर्यंत साखळीत देखील विविध चित्रपट दाखवले जाणार आहेत. या थिएटरची एकूण क्षमता १२० असून कोणताही चित्रपटप्रेमी विनामूल्य इथे चित्रपटांचा आनंद घेऊ शकतो. सकाळी ९ ते रात्री ९ अशी वेळ या कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT