International Film Festival  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

Outdoor Film Screenings: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपटांचे प्रदर्शन रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात होईल अशी अनेकांची आशा होती. मात्र यावेळी चित्रपटांचे प्रदर्शन केवळ खुल्या जागेत केले जाईल.

Manish Jadhav

सासष्टी: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपटांचे प्रदर्शन रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात होईल अशी अनेकांची आशा होती. मात्र यावेळी चित्रपटांचे प्रदर्शन केवळ खुल्या जागेत केले जाईल, अशी माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली. यंदा खुल्या जागेत सहा ते सात चित्रपट दाखवण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, मुख्य सभागृहात इफ्फी चित्रपटाचे प्रदर्शन नसल्याने हे सभागृह तियात्र सादरीकरणासाठी खुले करण्यात आले आहे. त्याप्रमाणे कार्यक्रम सूची तियात्र निर्मात्यांना दिली असल्याची माहिती तालक यांनी दिली. रवींद्र भवनमधील मुख्य सभागृहाच्या दुरुस्तीसाठी निविदा जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या दुरुस्तीत चित्रपट स्क्रीन, प्रोजेक्टर, आसन व्यवस्था, प्रकाश योजना सारख्या कामाचा समावेश आहे, असे तालक यांनी सांगितले.

रवींद्र भवनमधील संगीत कारंज्यांचे उद्‍घाटन 19 डिसेंबर रोजी करण्यात येईल, अशी माहिती तालक यांनी दिली. यंदा इफ्फीतील कार्यक्रम मडगावात होईल, त्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी यापूर्वी सांगितले होते.

यावर्षीच्या इफ्फीमध्ये 15 जागतिक, 40 आशियाई प्रीमियर तसेच106 भारतीय प्रीमियर्ससह 180 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट सादर केले जातील. यामध्ये जवळपास 81 देशांमधील पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा समावेश आहे. सिनेरसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Today's Live Updates Goa: ...तर मी चाललो मांद्रेत ! मायकल लोबोंचे वेगळ्या राजकारणाचे स्पष्ट संकेत

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

SCROLL FOR NEXT