इफ्फीच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करताना गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी सिनेमा म्हणजे भारतीय समाजजीवनाचे प्रतिबिंब असल्याचं म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
इफ्फीच्या मुख्य कार्यक्रमाला आरंभ झाला आहे. आरंभी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दाखवण्यात येणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या संघर्षाची झलक दाखवण्यात आली. याला अभिनेते मनोज वाजपेयी यांचा आवाज देण्यात आला आहे. त्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे बाजपेयी यांनी म्हटले आहे.
स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांना सत्यजित 'रे जीवनगौरव पुरस्कार' यांना प्रदान. हा पुरस्कार मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सौरा यांनी व्हिडीओद्वारे संदेश देत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर हा पुरस्कार सौरा यांच्या कन्या अॅना सौरा यांनी स्विकारला. 93 वयाचे कार्लोस सौरा यांनी सिनेसृष्टीसाठी आयुष्य वेचल्याबद्दल केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले.
ऑस्ट्रेलियातील नेते मला RRR सिनेमा पाहिला आहे का? असे विचारत असतील तर यातच भारतीय सिनेसृष्टीचे यश लपलेले आहे. असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
गोव्यात सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कार्यक्रमाच्या आरंभी अभिनेता मनोज वाजपेयी, अजय देवगण, परेश रावल यांचा त्यांच्या सत्कार करण्यात आला.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आरंभी पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, सिनेकलाकार यांना नव्या चित्रपट निर्मीतीसाठी गोव्यात आमंत्रित केले आहे. गोवा सरकार आपल्याला संपुर्ण सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये कलाकारांच्या स्वागतासाठी Red Carpet सज्ज
पहिल्या दिवशी डायटर बर्नर दिग्दर्शित ऑस्ट्रियन चित्रपट "अल्मा आणि ऑस्कर" ने सुरूवात झाली. या चित्रपटात व्हिएनीज समाजातील अल्मा आणि ऑस्ट्रियन कलाकार ऑस्कर यांच्या नात्याचे वर्णन केले आहे.
अभिनेते परेश रावल यांच्या 'स्टोरीटेलर' या चित्रपटाचे इफ्फीमध्ये प्रदर्शन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते आज रेड कार्पेटवर दाखल झाले आहेत. ''माझ्या चित्रपटाचे पहिल्यांदाच इफ्फीमध्ये प्रदर्शन होणार असल्याने आपल्याला आनंद झाल्याचे'' ही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला गोव्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमास उपस्थित आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला आजपासून गोव्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील पहिल्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. इफ्फी जगातील कलाकारांना आपले आकर्षित करणारे व्यासपीठ बनले असल्याचं ठाकूर यांनी म्हटले आहे.
जगभरातील सिनेकलाकारांनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला हजेरी लावली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.