Indian Panorama Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: "भारतात तुम्हाला ज्युरी म्हणून एकही महिला मिळाली नाही?", सुरू होण्यापूर्वीच इफ्फी वादाच्या भोवऱ्यात

IFFI 2025 jury controversy:" आयोजकांनी 'इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म्स' परीक्षकांच्या यादीत एकही महिला सदस्य नसल्यामुळे इंटरनेटवर इफ्फीला जोरदार ट्रोल केले

Akshata Chhatre

पणजी: ५६ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महोत्सवाच्या आयोजकांनी 'इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म्स' विभागासाठी घोषित केलेल्या परीक्षकांच्या यादीत एकही महिला सदस्य नसल्यामुळे इंटरनेटवर इफ्फीला जोरदार ट्रोल केले जात आहे.

केवळ पुरुषांची निवड, नेटकऱ्यांचा संताप

इफ्फीने नुकतेच इन्स्टाग्रामवर इंडियन पॅनोरमा विभागाच्या ज्युरी सदस्यांची घोषणा केली. अभिनेता राजा बुंदेला यांच्या अध्यक्षतेखालील या पॅनेलमध्ये कृष्णा हेब्बाळे, कमलेश के मिश्रा, मलय रे, सुभाष सहगल, जदुमोनी दत्ता, अरुण बक्षी, असीम सिन्हा, अशोक शरण, सुकुमार जटानिया, बी.एस. बसवराजू, अमरेश चक्रवर्ती आणि नेपोलियन थांगा यांसारख्या १३ जणांचा समावेश आहे.

मात्र, या सर्व सदस्यांमध्ये एकही महिला नसल्यामुळे नेटकऱ्यांनी 'लिंगभेद' आणि 'मॅनेल' असा थेट आरोप केला आहे. सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी "भारतात तुम्हाला ज्युरी म्हणून एकही महिला मिळाली नाही?" "महिला चित्रपट निर्माते सध्या खूप चर्चेत आहेत, त्यामुळे त्यांना थोडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले असावे, म्हणूनच त्यांनी 'मॅनेल' तयार केले!"

"ज्युरीमध्ये महिलांची कमतरता स्पष्टपणे दिसत आहे. सुधारणा करा!" "महिलांसाठी वेगळा ज्युरी पॅनेल आहे का, ज्यात फक्त महिला-निर्मित चित्रपटांसाठी महिला परीक्षक असतील?" अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

स्व. के.वैकुंठ यांचा गौरव व्हावा!

भारतीय चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य गोमंतकीय सिनेमाटोग्राफर स्व. के. वैकुंठ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करावा आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, अशी मागणी फिल्म फ्रॅटर्निटी ऑफ गोवा ने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bomb Threat: दिल्ली स्फोटानंतर 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, इंडिगो एअरलाईन्सला ई-मेल आल्याने खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

Goa Politics: गोव्यात 'व्यापम'पेक्षा मोठा घोटाळा! 'त्या' मंत्र्याला त्वरित हाकलून लावा; काँग्रेस मागणीवर ठाम

VIDEO: चीनमधील सर्वात उंच 'होंगची पूल' कोसळला! काही सेकंदात पुलाचे खांब नदीत धसले; भूस्खलनाचा थरार व्हिडिओमध्ये कैद

IND vs SA, Head To Head Record: ईडन गार्डन्स कोणासाठी लकी? टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

"पूजा नाईकने यापूर्वी कोणाचेही नाव घेतले नव्हते", CM सावंतांनी सांगितले 'नवीन FIR' चे कारण

SCROLL FOR NEXT