Goa IFFI 2024|Pramod Sawant|Secretary Ministry of Information and Broadcasting Sanjay Jaju Dainik Gomantak
गोवा

'IFFI 2024' संस्मरणीय होणार! सचिव जाजूंनी महोत्सव सर्वसमावेशक ,उत्सवपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

Goa IFFI 2024: संजय जाजू यांनी महोत्सव ज्या-ज्या ठिकाणी होणार आहे, त्याठिकाणी भेटी दिल्या व सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

गोमन्तक डिजिटल टीम

Goa IFFI News

पणजी: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव (इन्फॉर्मेशन ॲण्ड ब्रॉडकास्टिंग) संजय जाजू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि २०२४ च्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) अधिक लोककेंद्रित, सर्वसमावेशक आणि उत्सवपूर्ण करण्याच्या धोरणांवर चर्चा केली.

जाजू यांच्यासमवेत महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीचे सदस्य बॉबी बेदी, रवी कोट्टारकारा, प्रितुल कुमार, वृंदा देसाई, अनुरिमा शर्मा, श्रीराग मुकुंदन, मनोरजंन सोसायटीच्या सीईओ अंकिता मिश्रा आदी बैठकीला उपस्थित होत्या.

या ५५ व्या महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपट साजरे करणाऱ्या विशिष्ट थिमसह संचालनाचे नियोजन हा चर्चेतील प्रमुख मुद्दा होता. यावेळी महोत्सवात होणाऱ्या संवादात्मक कार्यक्रमांमुळे उपस्थितांना चित्रपट उद्योग आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या महोत्सवामध्ये तरुणांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी सिनेसृष्टीतील वाढत्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार ‘इफ्फी २०२४‘ हा एक संस्मरणीय बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.

महोत्सवाची कामे वेळेत करा!

तत्पूर्वी आदल्या दिवशी संजय जाजू यांनी महोत्सव ज्या-ज्या ठिकाणी होणार आहे, त्याठिकाणी भेटी दिल्या व सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भारत सरकारतर्फे दरवर्षी २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात इफ्फीचे आयोजन केले जाते. चित्रपटनिर्मितीच्या कलेची उत्कृष्टता प्रक्षेपित करण्यासाठी सिनेमाच्या जगाला एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भारतीय सिनेमा आणि त्यातील तरुणांना संधी आणि एक्सपोजर देऊन त्यांची वाढ वाढवणे हा ‘इफ्फी’चा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT