IFFI 2023 - Vishnu Surya Wagh's Poem removed from Peocock Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023: 'इफ्फी'च्या नियतकालिकातून वगळली विष्णू सूर्या वाघ यांची जातिभेदावरील कविता; सेन्सॉरशिपवरून वादाला तोंड

वाघ यांच्या 'सुधीरसुक्त' या संग्रहातील 'सेक्युलर' नावाची कविता रविवारी प्रकाशित होणार होती

Akshay Nirmale

IFFI 2023 Controversy over Vishnu Surya Wagh's Poem removed from Peocock: गोव्यात सध्या सुरू असलेल्या ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गोव्यातील दिवंगत लेखक आणि भाजपचे माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांची जातिभेदावरची कविता IFFI ने आपल्या पीकॉक या दैनिकात न छापल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

इफ्फीचे 'पीकॉक' हे दैनिक महोत्सव काळात प्रकाशित होत असते. वाघ यांनी लिहिलेल्या 'सुधीरसुक्त' (सुध्राचे स्तोत्र) या मोठ्या संग्रहाचा भाग असलेली 'सेक्युलर' नावाची ही कविता रविवारी पीकॉकमध्ये प्रकाशित होणार होती.

तथापि आंबेडकवारी कलाकार असलेल्या सिद्धेश गौतम यांना ही कविता प्रकाशित करण्यास मनाई करण्यात आली. गौतम यांनी वाघ यांना श्रद्धांजली वाहणारे पृष्ठ डिझाइन केले होते. त्यांनी एका Instagram पोस्टमध्ये ही माहिती दिली. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

गौतम यांनी म्हटले आहे की, ही कविता काळजीपूर्वक निवडली होती कारण ती शहरी आणि ग्रामीण भागात अनेकांना दररोज भेडसावणाऱ्या जातीभेदाच्या अनेक घटनांवर व्यक्त होणारी होती. मी माझ्या आयुष्यात अनेकदा अशा प्रसंगातून गेलो आहे.

असे अनेक घाव मनावर झेलले आहेत. तरीही त्याचे भांडवल न करता त्यातून मार्ग काढला आहे. आणि मी माझ्या कठोर परिश्रमाने आणि कठोर शब्दांनी माझी वाटचाल करत राहीन.

तथापि, समीक्षक मात्र वाघ यांचे कार्य पुसून टाकण्याचा एक व्यापक प्रयत्न म्हणून याकडे पाहत आहेत. काहींनी याला 'इफ्फीची सेन्सॉरशिप' असेही म्हटले आहे.

मानववंशशास्त्राचे अभ्यासक कौस्तुभ नाईक यांनी या कवितेचे पीकॉकसाठी इंग्रजी अनुवाद केला होता. ते म्हणाले की, कविता वगळणे ही इफ्फीच्या "सेन्सॉरशिपची दुर्दैवी कृती" आहे. कविता का सेन्सॉर केली याचा अंदाज लावता येत नाही.

पण संग्रह वाचला तर लक्षात येते की वाघ यांनी कवितांमधून भाषा, प्रतिमा आणि थीम यांचा वापर करत गोव्यातील बहुजन समाजाचा इतिहास नोंदवला आहे.

त्यांच्या कविता प्रस्थापितविरोधी भूमिका घेतात. कदाचित तेच कारण असेल. दुर्दैवाने, सेन्सॉरशिपची ही कृती संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे.

दरम्यान, 2017 मध्ये वाघ यांच्या 'सुधीरसुक्त' या काव्यसंग्रहाला कथित अश्लीलतेच्या आरोपाखाली आणि गोव्यातील उच्चभ्रू जातींना लक्ष्य केल्याच्या आरोपांवरून वादाचा सामना करावा लागला होता. या संग्रहासाठीचा राज्य साहित्य पुरस्कार सरकारने मागे घेतला आणि नंतर रद्द केला होता.

वाघ हे त्यावेळी आजारी होते. ते कोमात होते त्यामुळे ते एकाही आरोपाला उत्तर देऊ शकले नाहीत आणि 2019 मध्ये त्यांचे निधन झाले.

दरम्यान, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा म्हणाल्या, कविता न छापण्याचा निर्णय हा निव्वळ संपादकीय कॉल होता आणि त्यातील आशयाशी त्याचा काहीही संबंध नव्हता.

IFFI पीकॉक हे नियतकालिक सुरुवातीपासूनच कलात्मक स्वातंत्र्याचे ध्वजवाहक राहिले आहे आणि ते तसेच चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT