IFFI 2021will start from today big opening ceremony in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आजपासून सिनेमोत्सव,सिनेताऱ्यांची मांदियाळी

इफ्फीच्या इतिहासात प्रथमच नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, झी 5 आणि व्हायाकॉम यासारखे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्स बातम्या, मास्टरक्लास व इतर कार्यक्रमांतून सहभागी होत आहेत.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या सरत्या सावटामुळे या वर्षीदेखील प्रत्यक्ष आणि आभासी अशा हायब्रीड पध्दतीने आयोजित होत असलेल्या इफ्फीचा (IFFI2021) पडदा शनिवारी उघडणार आहे. देश-विदेशातील हजारो सिनेरसिक कालपासून गोव्यात आले असून, पुढील आठ दिवस गोव्यामध्ये उत्सवी वातावरण असणार आहे. यावर्षी कला अकादमीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आयनॉक्स हे इफ्फीचे मुख्य केंद्र असणार आहे. तर पर्वरी येथील आयनॉक्समध्ये सुध्दा काही सिनेमांचे प्रसारण करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी 4वाजता श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये हेमामालिनी यांच्या हस्ते 52 व्या इफ्फीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.(IFFI 2021will start from today big opening ceremony in Goa)

या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय विभागात 73 देशांतील 148 चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवात सुमारे 12 जागतिक प्रीमियर्स, सुमारे 7 आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, 26 आशियायी प्रीमियर्स आणि सुमारे 64 भारतीय प्रीमियर्स होतील. इफ्फीसाठी यावेळी 95 देशांमधून 624 चित्रपट आले होते. गेल्या वर्षी 69 देशांमधून चित्रपट आले होते.इफ्फीमध्ये जगभरातील सर्वोत्तम असे समकालीन आणि क्लासिक म्हणजेच, सर्वकालिक उत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात. जगभरातील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, टीकाकार-अभ्यासक आणि चित्रपट रसिकांची मंदियाळी या आठ दिवसांत महोत्सवात बघायला मिळते. विविध चित्रपटांचे प्रदर्शन, सादरीकरण, मास्टर क्लासेस, परिसंवाद, सहनिर्मिती, चर्चासत्रे आणि इतर अनेक भरगच्च कार्यक्रमांतून या महोत्सवात चित्रपट आणि चित्रपट निर्मितीचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

जीवनगौरवही ‘ऑनलाईन’

जागतिक चित्रपटसृष्टीतील मार्टिन स्कॉर्सेस आणि इस्टेव्हन स्झाबो या दोन प्रमुख दिग्गजांना पहिल्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने यंदा सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या संचालकांनी दिली. मात्र, कोरोना बंधनामुळे ते महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. तथापि, पुरस्कार स्वीकारणारे त्यांचे व्हिडिओ संदेश प्रसारित केले जातील.

प्रथमच ‘ओटीटी’ला प्राधान्य

इफ्फीच्या इतिहासात प्रथमच नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, झी 5 आणि व्हायाकॉम यासारखे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्स बातम्या, मास्टरक्लास व इतर कार्यक्रमांतून सहभागी होत आहेत. इफ्फीमध्ये पहिल्यांदा प्रतिनिधींना पॅरिसस्थित प्रसिद्ध ‘गॉबेलिन्स’ या इमेज ॲण्ड आर्टस् प्रशिक्षण संस्थेच्या तीन दिवसांच्या विशेष वर्गाचा आभासी पद्धतीने लाभ घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT