IFFI 2021 Dainik Gomantak
गोवा

इफ्‍फीत 'गोवा विभाग' सिनेमांना लाभ मिळेल ?

दिगंबर कामत यांचा सरकारला सवाल..!

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा (goa) मनोरंजन सोसायटीच्या वतीने आज इफ्‍फीतील (IFFI2021) गोवा विभागामधील सिनेमांची घोषणा करण्यात आली. चार लघुपट आणि एक सिनेमाचा समावेश असलेल्या या विभागात निवडलेल्या सिनेकर्मींचे अभिनंदन करतानाच या सिनेमांना राज्यातील सिनेअनुदान योजनेचा लाभ मिळणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (digamber kamat) यांनी केला आहे.

गोवा विभागात निवडल्या गेलेल्या सदर चित्रपटांच्या निर्मात्यांना गोवा चित्रपट अनुदान योजनेखाली अर्थसहाय्य मिळणार का व सदर विभाग हा इफ्फीचा अधिकृत विभाग असेल का, यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे, अशी मागणी कामत यांनी केली आहे. नियमावलीतील कलम ९ सरकारने ताबडतोब रद्द करावे व या निवडलेल्या पाच चित्रपटांना गोवा चित्रपट अनुदान योजनेखाली ५ लाख व २.५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करावे अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

सरकारने स्थानिक चित्रपट निर्मात्यांप्रती संवेदनशील राहणे गरजेचे आहे. कोविड महामारीत सर्व संकटांचा सामना करून त्यांनी चित्रपट निर्मिती केली ही अभिमानास्पद बाब होय. इफ्फीत प्रदर्शित करण्यासाठी निवडण्यात आलेल्या पाचही चित्रपटांच्या निर्मात्यांचे व कलाकारांचे मी अभिनंदन करतो.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa nightclub fire: गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू, हडफडेच्या रोमिओ लेनमध्ये घडली घटना

Horoscope: आर्थिक स्थैर्य मिळण्याची चिन्हे, परदेशाशी संबंधित कामांसाठी दिवस 'शुभ'; मात्र शत्रूपासून सावध राहा!

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT