गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असुन नवे वर्ष 2023 चे आगमन होण्यास फक्त 10 दिवस बाकी आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या ऍन्जॉय करण्यासाठी पर्यटक गोव्याच्या दिशेने येउ लागले आहेत. त्यामुळे पुढील दोन वीकेंडसाठी गोव्याचे विमान भाडे तिप्पटीने वाढले आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई ते गोवा मार्गावरील विमानाच्या तिकिटामध्ये 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 23 आणि 24 डिसेंबरसाठी तिकीटाची किंंमत 5 हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.
बेंगळुरू ते गोवा या मार्गावरील विमानाच्या तिकिटाची किंमत 3 हजार 500 रुपये एवढी आहे. 23 डिसेंबरसाठी 10 हजार रुपये तर ख्रिसमसच्या व नवीन वर्षाच्या आठवड्याच्या शेवटी 7 हजार 200 रुपये तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.
दिल्ली ते गोवा या मार्गावर नेहमीचा तिकीटाचा दर हा 6 हजार 500 रुपये एवढा आहे. त्या दराच्या तुलनेत 23 आणि 24 डिसेंबरसाठी नवी दिल्ली ते गोवा तिकिटाची किंमत 10 हजार 500 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे, 28 ते 30 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली ते गोवा तिकिटाची किंमत जवळपास 12 हजार रुपये एवढी आहे. नवीन वर्षात 2 जानेवारीला दिल्लीला जाणाऱ्या परतीच्या विमानाच्या तिकीटाची किंमत जवळपास 13 हजार रुपये एवढी आहे.
हैदराबाद ते गोवा या मार्गावर 23 आणि 24 डिसेंबरसाठी तिकिटाची किंमत 7 हजार ते 8 हजार रुपये एवढी वाढवण्यात आली आहे. तर 1 व 2 जानेवारीला तिकिटाची किंमत 5 हजार एवढी असण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चेन्नई ते गोवा या मार्गावरील विमानाच्या तिकिटामध्ये दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 8,000 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. चेन्नई ते गोवा तिकीटाची किंमत 4 हजार 400 रुपये एवढी आहे. परंतु 23 आणि 24 डिसेंबरसाठी 12 हजार 700 रुपये एवढी तिकीटाची किंमत वाढवण्यात आली आहे.
नागपूर ते गोवा या मार्गावरील विमानाच्या तिकिटामध्ये 23 आणि 24 डिसेंबरसाठी 8 ते 9 हजार रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. तर 1 व 2 जानेवारीला तिकिटाची किंमत 6 हजार 600 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
सध्या, पुणे, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मार्गांवरील लक्झरी बसच्या भाड्याचे नियमित दर एका सीटसाठी 1 हजार 500 रुपये आहेत. जरी काहींनी AC स्लीपर तिकिटासाठी त्यांच्या किमती रु. 3,000 पर्यंत वाढवल्या आहेत. काहींनी एसी स्लीपरच्या तिकिटांच्या किमती 3 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.