Churchill Alemao Dainik gomantak
गोवा

'युती झाल्यास 'या' पक्षाला मिळणार चार जागा'

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अशा धर्मांध कार्यकर्त्यांना तडीपार करावे

दैनिक गोमन्तक

मडगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करण्याची शक्यता तृणमूलचे नेते चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीला चार जागा सोडण्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा आपल्याकडे बोलले आहेत. मात्र ही बोलणी प्राथमिक अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. युती झाल्यास दाबोळीची जागा डिसोझा यांना सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बांधकाम तोडणार असे सांगून तीन महिने झाले तरी त्यावर अजून कारवाई झालेली नाही. याबद्दल आलेमाव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे बांधकाम पाडणार असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी (CM) आपला शब्द पाळावा अन्यथा लोक त्यांना निवडणुकीत (elections) धडा शिकवतील. हे बांधकाम मोडले नाही तर भाजपचे पाच उमेदवार निवडून येणेही कठीण असे ते म्हणाले.

गोव्यात (goa) बजरंग दलाचे कार्यकर्ते पुन्हा आपले डोके वर काढत आहेत. गोव्यात ते धार्मिक कलह माजवू पहात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने (government) अशा धर्मांध कार्यकर्त्यांना तडीपार करावे अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT