michael lobo Dainik gomantak
गोवा

'सरकार बाहेरचा माणूस चालवत असेल तर मायकलने त्यांचे नाव उघड करावे'

मायकलने फक्त ड्रग्सचा धंदा वाढवला; उर्फ़ान मुल्ला

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात भाजपचे सरकार जर भलतीच व्यक्ती चालवीत असेल तर या सरकारात मंत्री असताना मायकल लोबो (Michael Lobo) यांनी त्यावर आवाज का उठवला नाही? असा सवाल करत हिम्मत असल्यास लोबो यांनी त्या व्यक्तीचे नाव जाहीर करावे अन्यथा परिणामास तयार राहावे असा इशारा भाजप प्रवक्ते उर्फ़ान मुल्ला यांनी दिला.

आज मडगावात (Margao) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुल्ला यांनी जर अशी कुणी व्यक्ती गोव्यात (goa) भाजप संघटना सुदृढ करण्यास वावरत असल्यास आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल असे म्हटले.

लोबो यांनी दुसऱ्या पक्षावर आरोप करण्याऐवजी आपण मंत्री असताना स्वतः काय केले ते लोकांना सांगावे असे आव्हान त्यांनी दिले. मुल्ला म्हणाले, लोबो यांनी आपल्या मतदारसंघाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. उलट या मतदारसंघात वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सचा धंदा कसा वाढेल तेच पाहिले. या लोबोवर त्यावेळी काँग्रेस (Congress) प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही टीका केली होती. दुर्दैवाने तेच आता त्यांच्या पक्षाचे उमेदवार बनले आहेत असे ते म्हणाले.

येणारे सरकार हे भाजपचेच (BJP) असणार याची खात्री लोबो याना पटली आहे. जर भाजप सत्तेवर आले तर आपल्याविरुद्ध कारवाई अटळ हे आता त्यांना समजून चुकले आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे असे मुल्ला म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: "पाऊण तास...", मंत्री ढवळीकरांनी सांगितला जुन्या मखराचा थरारक अनुभव; उलगडली कामाक्षी मंदिरातील अनोखी परंपरा

'आधी निवडणूक जिंकून दाखवा, लोकांची दिशाभूल करून मनोज परबांनी राजकीय पोळी भाजू नये'; मंत्री नीळकंठ हळर्णकर

Heart Health: स्क्रिनच्या अतिवापरामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! वाचा काय आहे डिजिटल युगातील 'Heart Attack'

उद्धवस्त रनवे आणि जळालेल्या इमारती विजय वाटत असेल तर त्यांनी त्याचा आनंद घ्यावा; 3 मिनिटांत भारताने पाकच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला Watch Video

Goa University: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकाचोरीचे पुढे काय झाले?

SCROLL FOR NEXT