Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Case: थकीत वेतन वेळेत न दिल्यास खाण बंद पाडू

Goa Mining Case: 'वेदांता सेझा गोवा’ला इशारा: लेखी आश्‍वासनानंतर कामगारांचे धरणे मागे

दैनिक गोमन्तक

Goa Mining Case: सेझा मायनिंग कॉर्पोरेशन लि. कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून पीएफ व खाण व्यवसाय बंद असलेल्या काळातील थकीत वेतन न दिल्याने दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी पणजीतील सेझा घरमधील कार्यालयात धडक देऊन धरणे धरले. त्यांची देय रक्कम व थकीत वेतन येत्या 10 डिसेंबरपर्यत देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे धरणे मागे घेतले.

या मुदतीत रक्कम मिळाली नाही, तर डिचोलीतील खनिज माल उचलण्याचे काम बंद पाडू,असा इशारा कर्मचाऱ्यांनी कंपनीला दिला आहे.

सेझा खाण कंपनीत कामाला असलेल्या सुमारे 300 जणांना वेदांता कंपनीच्या अटी मान्य नसल्याने सेवेतून जूनमध्ये काढले होते. तेव्हापासून त्यांचा पीएफ देणे रखडल्याने आज पणजीतील कार्यालयात धडक दिली.

‘सेझा’ ने म्हटले की,

‘सेझा’ कडून त्यांच्या पीएफचा अर्ज १ नोव्हेंबरला कंपनीच्या मुख्य कार्यालयात पोहचला असून त्याचे मूल्यांकन सुरू आहे. त्यासाठी काही वेळ लागणार आहे. येत्या १० डिसेंबरपर्यंत त्यांची पीएफची रक्कम वितरित केली जाईल.

31 अटींमुळे कामगारांची गळचेपी !

धेंपो कंपनीने सेझा कंपनीला खाणी विकल्यानंतर कर्मचाऱ्यांना जसे अटींशिवाय कामावर ‘सेझा’ने घेतले होते, तसेच ‘सेझा’मधून ‘वेदांता’मध्ये घ्यावे अशी अट आहे. ‘वेदांता’ ने कामगारांपुढे 31 अटी ठेवल्या आहेत, त्या मान्य नाहीत. या अटीमधून कामगारांची गळचेपी होत आहे, अशी बाजू कर्मचाऱ्यांचे सल्लागार ॲड.अजय प्रभुगावकर यांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT