Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa Election: सांगे मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव झाल्यास स्वागतच!

Goa Election: सुभाष फळदेसाई : अन्य मतदारसंघांतही माझे काम

दैनिक गोमन्तक

Goa Election: सध्या गोव्यात एससी, एसटी आणि अन्य मागासवर्गीयांसाठी राखीव मतदारसंघांची मागणी होत आहे. सांगेत मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीचे लोक आहेत. त्यामुळे सांगे मतदारसंघ राखीव होईल, अशी चर्चा आहे.

तसे झाल्यास सांगेचे विद्यमान आमदार सुभाष फळदेसाई काय करणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असता, तसे झाल्यास पक्ष सांगेल तेथून रिंगणात उतरण्याची माझी तयारी आहे. अन्य मतदारसंघांतही माझे काम आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव झाल्यास स्वागतच आहे. तसे झाल्यास पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे, असा विश्वास समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला. सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव झाल्यास स्वागतच आहे, असा पुनरुच्चार केला.

...तर ‘आयआयटी’ प्रकल्प मागे

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते आयआयटी प्रकल्पाबद्दलही बोलले. आयआयटीसाठी जमीन कमी पडल्यास माझी जमीन देण्यास मी सिद्ध आहे. आयआयटीला 30 टक्क्यांहून अधिक स्थानिकांचा विरोध झाल्यास आयआयटी प्रकल्प मागे घेऊ, असेही ते म्हणाले.

उद्योग-व्यवसाय सुरूच राहावेत!

पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला माझा विरोध नाही. या भागात फार पूर्वीपासून घरे आहेत. अभयारण्यामुळे भूमिगत वीजवाहिनी घालण्यात अडचण येत आहे. सांगे तालुका मागास आहे. सध्या सुरू असलेले उद्योग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र झाल्यानंतरही सुरूच राहावेत. नव्या उद्योगांवर बंधने घालायला हरकत नाही. या क्षेत्रातील खाणी टप्प्याटप्प्याने बंद कराव्यात, असे तज्ज्ञ समितीच्या सदस्यांना सांगितले आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

SCROLL FOR NEXT