Rahul Gandhi disrespect mother remark Dainik Gomantak
गोवा

आईचा आदर न करणारा व्यक्ती भारतमातेचा काय आदर करणार? राहुल गांधी आई सोनिया गांधींवर ओरडायचे; विश्वजीत राणेंनी सांगितला किस्सा

Vishwajit Rane Interview: आई - वडिलांना ईश्वरसमान मानले जाते पण जो व्यती आईवर ओरडतो तो काय भारतमातेचा सन्मान करणार, येथील लोकांना काय समजून घेणार; विश्वजीत राणे

Pramod Yadav

पणजी: ‘राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यावर ओरडायचे’, असा एक किस्सा गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितला. वडील प्रतापसिंह राणे या प्रसंगाचे साक्षीदार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, ‘जो व्यक्ती आईचा आदर करु शकत नाही तो भारत मातेचा काय आदर करणारा’, असे राणे म्हणाले.

मंत्री विश्वजीत राणे यांनी सुशांत सिन्हा यांच्या टॉप अँगल सदराखाली एक मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

“राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यावर ओराडायचे, माझे वडील (प्रतापसिंह राणे) या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. मी खूपच वादग्रस्त वक्तव्य करतोय, असे विश्वजीत राणे म्हणाले. राहुल गांधींचे मी असे रुप केव्हा पाहिले नसल्याचे वडिलांनी सांगितल्याचे राणे म्हणाले. आणि आईचा आदर न करणारा व्यक्ती भारतमातेचा काय सन्मान करणार?,” असे विश्वजीत राणे म्हणाले.

“सार्वजनिक ठिकाणी आईचा आदर करणारे राहुल गांधीचे रुप वेगळे आहे. आई- वडील श्रद्धस्थानी आणि देवासमान मानले जाते”, असेही राणे म्हणाले.

वडील आणि मुलांमध्ये भाजप आणि काँग्रेसवरुन वाद होतो का? या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी असं केव्हा झालं नसल्याचे सांगितले. तसेच, वडिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास होता असेही त्यांनी नमूद केले.

भाजप आणि काँग्रेसमध्ये शिस्तीचा मोठा फरक असल्याचे राणे म्हणाले. काँग्रेसच्या तिकिटावर मी निवडून आलो नव्हतो, अपक्ष निवडून आल्यानंतर मी सरकारला समर्थन दिल्यानंतर मंत्रिपद मिळाले होते, असे राणे यांनी स्पष्ट केले. मंत्रिपदावर कायम राहण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट पक्षाने ठेवल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.

मी मोदी भक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासाठी प्रेरणास्थानी आहेत. मोदींवर माझे प्रेम आहे, मी मोदी भक्त आहे. देशात ज्याप्रकारचा विकास सुरु आहे, जो दृष्टीकोन घेऊन वाटचाल सुरु आहे हे खूपच प्रेरणादायी आहे. मी मोदी भक्त आहे यासाठी लोकांनी मला ट्रोल केले तरी फरक पडत नाही”, असे विश्वजीत राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT