Nutmeg Dainik Gomantak
गोवा

Nutmeg Farming: जायफळाची शेती मोठी फायदेशीर, पण त्याच्या उपपदार्थांपासूनही 'अशाप्रकारे' मिळवता येतो आर्थिक लाभ

डॉ. ए. आर. देसाई : नव्‍या जातींची लागवड करा; ज्यूस, कँडी, माऊथ फ्रेशनर बनवून आर्थिक सुबत्ता मिळवा

गोमन्तक डिजिटल टीम

अनिल पाटील

राज्‍यात उगवणाऱ्या विविध मसाल्यांच्या पदार्थांबरोबर जायफळाची शेतीही उपयुक्त ठरत आहे. ‘आयसीएआर’च्या केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्थेने जायफळाच्या मुख्य मसाल्यांबरोबर टाकून दिला जाणाऱ्या वरील आवरणापासून सरबत (ज्यूस), कॅंडी आणि माऊथ फ्रेशनर बनवले आहे.

शेतकऱ्यांनी अशा पूरक पदार्थांची निर्मिती केल्यास त्यांच्‍या उत्पन्नात वाढ होईल, असे मत शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. देसाई यांनी व्यक्त केले.

डॉ. देसाई हे गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळ जायफळाच्या जाती आणि त्यांच्या उपपदार्थांवर संशोधन करत आहेत. त्यांनी जायफळाच्या तीन प्रजातींचा शोध लावलाय. गोव्यातील ‘तामसुली’ या मुख्य जातीपासून एनएम 1, 2 आणि 3 या जातींची निर्मिती त्‍यांनी केली आहे.

या जातींमध्ये मोठ्या आकाराच्‍या जायफळाबरोबर जायपत्रीचे प्रमाणही जास्त आहे. शेतकऱ्यांनी अशा नव्या आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

Nutmeg

शेतकरी जायफळाचे उत्पादन घेताना केवळ फळ, त्याच्या भोवतीची मगज म्हणजेच जायपत्री काढून घेतात आणि सुमारे 70 टक्के भाग फेकून देतात. या टाकून दिल्या जाणाऱ्या आवरणापासून संशोधन केंद्राने अनेक उपपदार्थांची निर्मिती केली आहे.

प्रामुख्याने या आवरणापासून बनवलेला जायफळ सरबत (ज्यूस) अनेकांच्या पसंतीला पडले आहे. लवकरच आम्ही त्‍याचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे डॉ. देसाई म्‍हणाले.

जायफळ कँडी, माऊथ फ्रेशनरला पसंती

जायफळाच्‍या आवरणापासून बनविलेली जायफळ कॅंडीसुद्धा खवय्यांची पहिली पसंती ठरली आहे. त्यानंतर याच भागापासून बनवलेले माऊथ फ्रेशनरही उपयुक्त ठरत आहे.

कारण जायफळाच्या मुख्य मसाल्यापासून बनवलेले उपपदार्थ एकूण उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ करतात. यासाठी शेतकऱ्यांनी जुने गोवे येतील कृषी संशोधन केंद्राला नक्कीच भेट द्यावी.

जायफळाच्या वरील आवरणापासून बनवलेला ज्यूस हा अनेक अर्थाने पौष्टिक आणि पचनासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे असतात. म्हणूनच जायफळ हे बहुगुणी मानले जाते. याचा मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो.

शेतकरी जायफळाचे उत्पादन घेताना केवळ फळ, त्याच्या भोवतीची मगज म्हणजेच जायपत्री काढून घेतात आणि सुमारे 70 टक्के भाग फेकून देतात.

हा वाया जाणारा बायोमास आमच्या संशोधनाचा विषय होता. या टाकून दिल्या जाणाऱ्या आवरणापासून संशोधन केंद्राने अनेक उपपदार्थांची निर्मिती केली आहे.

- डॉ. ए. आर. देसाई, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT