laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'भाजपने विश्वासघात आणि अपमान केला'; गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खदखद

laxmikant Parsekar On BJP: मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असताना भाजप समर्थित उमेदवाराविरोधात मी निवडणूक लढवली', असे पार्सेकर म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: "काही गोष्टी माझ्या इच्छेविरुद्ध घडल्या. माझा भाजपने विश्वासघात आणि अपमान केला, अशी भावना माझ्या मनात उत्पन्न झाली", अशा भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी व्यक्त केल्या. २०२२ च्या निवडणुकीपूर्वीचा अनुभव मांडताना पार्सेकरांनी हे मत व्यक्त केले.

'मी ३६५ मतांनी सुरुवात केली होती. पहिल्या निवडणुकीत यश नाही मिळाले त्यानंतर सततच्या प्रयत्नानंतर तिसऱ्यावेळी अखेर मला विजय मिळाला. पण, माझ्या विजयी होण्याच्या मेरिटवर शंका घेऊन भाजपने २०२२ मध्ये मला तिकीट नाकारले. अशावेळी शांत बसणे म्हणजे माझी राजकीय कारकिर्द संपल्यासारखे गृहीत धरले जाण्याची शक्यता होती. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असताना भाजप समर्थित उमेदवाराविरोधात मी निवडणूक लढवली', असे पार्सेकर म्हणाले.

'सर्व प्रयत्न करुन देखील माझ्या विरोधातील उमेदवाराला केवळ दोन हजार मतांनी विजय मिळवता आला. माझ्याशी अनेक राजकीय पक्षांनी संपर्क साधला. पण, माझ्या मूल्यांशी तडजोड न करता मी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आणि आजवर मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही', असे पार्सेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT