Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Francisco Sardinha : लोकसभेत मी झोपत नाही : फ्रान्सिस सार्दिन

लोकांना कामाची जाण : राज्याचे अनेक प्रश्न उपस्थित केले आणि करत राहणार असल्याचंही स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

Francisco Sardinha : मी लोकसभेत झोपत नाही. गेल्या चार वर्षांत मी गोव्याच्या अनेक प्रश्र्नांना लोकसभेत वाचा फोडली आहे आणि फोडत आहे. जे माझ्यावर टीका करतात, त्यांनी मला कधीही मतदान केले नाही. दक्षिण गोव्यातील लोकांना माझ्या कामाची जाण असल्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जेव्हा मला संधी मिळाली, तेव्हा मी गोव्याचेच प्रश्न मांडले. गेल्या अडीच वर्षांपासून खाण बंदी, तीन रेषीय प्रकल्प, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, पोस्ट कचेरीतील गोमंतकीयांची भरती हे प्रश्न मी उपस्थित करीत आहे. या लोकसभा अधिवेशनात मी गोवा वेल्हा येथील बेकायदा बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला, असे सार्दिन म्हणाले.

2023 पासून खासदार निधी मिळणार

गोव्यातील पंचायत निवडणुकांसंदर्भात सार्दिन यांनी सांगितले की, पंचायत प्रभागांचे आरक्षण करताना सरकारने गोंधळ घातला आहे. तरीही लोकांनी मतदानात भाग घेतला हे महत्त्वाचे. गेल्या दोन वर्षांपासून खासदार विकास निधी बंद आहे; पण 2023 पासून खासदार निधीतील रक्कम मिळणार आहे व पुन्हा ग्रामीण विकासावर भर देणार असल्याचे सार्दिन यांनी स्पष्ट केले.

...म्हणून ‘ईडी’चे छापे

विरोधी पक्षांनी लोकसभेचे कामकाज बंद पाडावे ही सरकारचीही अपेक्षा आहे. त्याचसाठी लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीमार्फत छापे टाकले जात आहेत. सरकार महागाईवर बोलण्यास तयार नाही. गरजेच्या वस्तूंवरही कर बसविला आहे, ही गंभीर बाब असल्याचे सार्दिन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT